मुलींच्या प्रगतीवरच भारताचे भविष्य अवलंबून
By Admin | Published: July 16, 2016 01:39 AM2016-07-16T01:39:59+5:302016-07-16T01:39:59+5:30
देशाच्या एकूण लोकसंख्येत महिलांचे प्रमाण ५० टक्क्यांच्या जवळपास आहे. भावी भारताच्या प्रगतीचे स्वप्न बघायचे असेल तर
सु. सो. शिंदे यांचे प्रतिपादन : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने कायदेविषयक शिबिर
गडचिरोली : देशाच्या एकूण लोकसंख्येत महिलांचे प्रमाण ५० टक्क्यांच्या जवळपास आहे. भावी भारताच्या प्रगतीचे स्वप्न बघायचे असेल तर आजच्या विद्यार्थिनींना प्रत्येक बाबतीत प्रगत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सु. सो. शिंदे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली व प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जुलै रोजी प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल येथे ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ व ‘मुलांचे हक्क व त्याची कायदे’ या विषयावर कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सु. सो. शिंदे बोलत होते.
कार्यक्रमादरम्यान प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा न्यायाधीश-१ तथा सहायक सत्र न्यायाधिश यू. एम. पदवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) ता. के. जगदाडे, मुख्य न्याय दंडाधिकारी आर. बी. रेहपाडे, प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलचे अध्यक्ष डॉ. कमरूद्दीन लाखानी, महासचिव अजीज नाथानी, संचालक राजू देवानी, समीर हिरानी, प्राचार्य रहीम अमलानी, उपप्राचार्य सोहन मंगर यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
प्रास्ताविक भाषणातून ता. के. जगदाडे यांनी मुलांविषयक कायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश सु. सो. शिंदे यांनी मुलांचे राज्यघटनेतील कायदे या संबंधी मार्गदर्शन केले. संचालन फाल्गुनी बोधलकर तर आभार सोहन मंगर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलचे कर्मचारी व जिल्हा विधी प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)