तळागाळातील व्यक्ती न्यायापासून वंचित राहू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:03 AM2018-11-24T01:03:04+5:302018-11-24T01:03:49+5:30
कायदा गरीब श्रीमंत हा भेद करीत नाही. ‘न्याय सर्वांसाठी’ ही शासनाची संकल्पना आहे. न्यायापासून तळागाळातील कोणताही व्यक्ती वंचीत राहू नये याकरिता विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. याचा लाभ सामान्य माणसांनी घ्यावा, असे आवाहन कुरखेडा न्यायालयाचे न्यायाधीश एम. आर. बागडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कायदा गरीब श्रीमंत हा भेद करीत नाही. ‘न्याय सर्वांसाठी’ ही शासनाची संकल्पना आहे. न्यायापासून तळागाळातील कोणताही व्यक्ती वंचीत राहू नये याकरिता विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. याचा लाभ सामान्य माणसांनी घ्यावा, असे आवाहन कुरखेडा न्यायालयाचे न्यायाधीश एम. आर. बागडे यांनी केले.
तालुका विधी सेवा समितीच्या वतीने विधी सप्ताहनिमित्त शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन गुरु वारी करण्यात आले. रॅली न्यायलय परिसरातून सुरू करण्यात आली. त्यानंतर शहरातील विविध वॉॅर्डातून रॅली फिरविण्यात आली. श्रीराम विद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. येथे मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी न्या. एम. आर. बागडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पुणे येथे कार्यरत न्यायाधीश संजय सहारे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहायक सरकारी अधिवक्ता अॅड. अविनाश नाकाडे, वकील संघाचे अॅड. प्रमोद बुद्धे, अॅड. उमेश वालदे, अॅड. छन्ना जनबंधू, अॅड. गोकूल नागमोती, अॅड. उईके, श्रीराम शाळा समितीचे अध्यक्ष वामनराव फाये, सामाजिक कार्यकर्ते पंढरी नाकाडे उपस्थित होते. पुढे मार्गदर्शनात न्यायाधीश बागडे म्हणाले, मोबाइलच्या दुरु पयोगाचे प्रमाण वाढत आहे. हे टाळत विद्यार्जनाकरिता मोबाइलचा उपयोग करावा, व्यसनांपासून दूर राहावे, अभ्यासाप्रति गांभीर्य दाखवत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी. कायद्याचा चौकटीत जीवन व्यतीत करून आदर्श नागरिक म्हणून नावलौकिक करावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन सहायक सरकारी अधिवक्ता अॅड. अविनाश नाकाडे तर आभार अॅड. उमेश वालदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधीसेवा समितीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.