गडचिराेली शहरात अनेक ठिकाणी निकृष्ट बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:27 AM2021-06-01T04:27:51+5:302021-06-01T04:27:51+5:30
शहरातील अंतर्गत नाली बांधकामाकरिता १७ काेटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र यातील बहुतांश नाल्यांचे बाधंकाम निकृष्ट दर्जाचे हाेत ...
शहरातील अंतर्गत नाली बांधकामाकरिता १७ काेटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र यातील बहुतांश नाल्यांचे बाधंकाम निकृष्ट दर्जाचे हाेत आहे. जुन्या अस्तित्वात असलेल्या नाल्यांवर जरी झाकणे लावली असती तरी पाच ते सहा काेटी रुपये वाचले असते. जनतेला विश्वासात न घेता जनतेची लूट केली जात आहे. गडचिराेली-चामाेर्शी मार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. मूल मार्गावरील रस्ता दुभाजक अतिशय कमी उंचीचे बांधण्यात आले आहेत.
निधीअभावी जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व बल्लारशहा येथील रस्ता दुभाजकावर स्टीलचे ग्रील बसविण्यात आले आहेत. यासाठी माेठ्या प्रमाणात निधीची गरज राहते. तेवढा निधी मिळविण्यासाठी लाेकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा लागते. मात्र जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधी पाठपुरावा करण्यात कमी पडत असल्याने निधी उपलब्ध हाेत नाही. जनतेच्या विकासाकरिता नागरिकांनी जागरूक असणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया डी. एन. बर्लावार यांनी व्यक्त केली आहे.