कोरोनाबाधितांना निकृष्ट जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 05:00 AM2020-10-13T05:00:00+5:302020-10-13T05:00:20+5:30
कोरोनाबाधितांना नाश्त्यामध्ये पोहा दिला जातो. जेवणात भात, भाजी, पोळी दिली जाते. परंतु जाड तांदळापासून भात तयार केला असता, तसेच ते अर्धवट सिजलेले असते. आठ दिवस आलुवांग्याची भाजी दिली जाते. यात आलुवांगे कमी व रस्सा अधिक असतो. रुग्णांची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिक बिकट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : येथील कोविड केअर सेंटर आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात स्थापित करण्यात आले आहे. येथे अनेक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु त्यांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याने अनेक रुग्ण जेवणानंतर उलट्या करतात. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कोरोनाबाधितांना नाश्त्यामध्ये पोहा दिला जातो. जेवणात भात, भाजी, पोळी दिली जाते. परंतु जाड तांदळापासून भात तयार केला असता, तसेच ते अर्धवट सिजलेले असते. आठ दिवस आलुवांग्याची भाजी दिली जाते. यात आलुवांगे कमी व रस्सा अधिक असतो. रुग्णांची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिक बिकट होत आहे. त्यामुळे या रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तालुक्यातील अनेक रुग्ण बाधित झाल्यानंतरही वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये येण्यास तयार होत नाही. मागील १० दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र बोटेकसा व आरोग्य विभाग कोरची येथील काही कर्मचारी क्वॉरंटाईन सेंटरमध्ये आहेत. मात्र त्यांना सुद्धा निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची ही स्थिती असले तर सर्वसामान्य लोकांचे हाल कसे असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत कंत्राटदार भोयर यांची रुग्णांनी तक्रार केली असता, त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निर्देशानुसार जेवण दिले जात असल्याचे सांगितले.
कोरची येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना ठेकेदारांच्या माध्यमातून जेवण दिले जाते. सकाळी नाश्त्यामध्ये सफरचंद, उकडलेला एक अंडा, आलूपोहा व ज्युस दिला जातो. तर जेवणात भात, भाजी, वरण, पोळी आदी दिले जाते.
- डॉ.शीतल उईके, कोविड केअर सेंटर, कोरची