निकृष्ट रस्ता कामाने शहरवासीयांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:25 AM2021-07-10T04:25:35+5:302021-07-10T04:25:35+5:30
गडचिराेली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नगराेत्थान याेजनेतून तब्बल ९५ लाख रुपये किमतीचा जिल्हा महिला रुग्णालयाच्या मागील रस्त्याचे सिमेंट ...
गडचिराेली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नगराेत्थान याेजनेतून तब्बल ९५ लाख रुपये किमतीचा जिल्हा महिला रुग्णालयाच्या मागील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून अल्पावधीतच काँक्रीटीकरण खाली दबले आहे. परिणामी या राेडवर काही ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे.
सदर मार्गाने दुचाकी वाहनांची माेठी वर्दळ असते शिवाय सायकलस्वार व नागरिकही येथून आवागमन करतात. काम निकृष्ट झाल्याचा आराेप या मार्गालगतचे नागरिक व व्यावसायिकांनी केला आहे.
लेखी तक्रारीनंतर न. प. प्रशासनाच्या या रस्ता कामाचे थर्ड पार्टीच्यावतीने चाैकशी करण्यात आली. त्यात काम निकृष्ट झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सदर मार्गाचे काम पुन्हा याेग्यरित्या करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.