कपाशीवर गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:43 AM2021-09-04T04:43:11+5:302021-09-04T04:43:11+5:30

मुलचेरा तालुक्यातील धन्नूर गावात आदिवासी शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम व कृषी निविष्टांचे वाटप कार्यक्रमादरम्यान करण्यात आले. विशेषतः दोन आदिवासी ...

Infestation of pink bollworm on cotton | कपाशीवर गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव

कपाशीवर गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव

Next

मुलचेरा तालुक्यातील धन्नूर गावात आदिवासी शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम व कृषी निविष्टांचे वाटप कार्यक्रमादरम्यान करण्यात आले. विशेषतः दोन आदिवासी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकात्मिक कीड, रोग व तण व्यवस्थापन किटचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. चिन्ना नाईक यांच्या मार्गदर्शनात कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. परिसरात कपाशीचे पीक सुमारे ६५-७० दिवसांचे असून जिल्ह्यातील बहुतेक कापूस गावांमध्ये डोमकळी, कामगंध सापळ्यातील नर पतंग किंवा बोंडात अळीचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. फक्त काही पीक क्षेत्रातच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला; पण तो आर्थिक नुकसान पातळीच्या खाली होता. याव्यतिरिक्त सर्वेक्षण केलेल्या कपाशीत थोड्या प्रमाणात मायरोथेसियम व कोरिनेस्पोरा बुरशींचे ठिपके आणि आंतरिक बोंड सड रोग आढळून आला. या कार्यक्रमात परिसरातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

बाॅक्स

अशी करा उपाययाेजना

निरीक्षणादरम्यान शास्त्रज्ञांनी कपाशीत डोमकळी शेतात आढळल्यास ताबडतोब नष्ट करावयाचे सांगून कडुनिंबाचे तेल किंवा निंबोळी अर्क ५ टक्के फवारणी करण्याचे सुचविले. गुलाबी बोंडअळी आणि शोषक कीटकांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर तसेच पानांवरील बुरशीचे ठिपके रोग आढळल्यास केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोलीद्वारे सुचवलेल्या शिफारशींच्या साहाय्याने रासायनिक कीटकनाशकांची व बुरशीनाशकांची फवारणी केली जाऊ शकते, असे सांगितले.

030921\03gad_1_03092021_30.jpg

धन्नूर येथे कापसावरील राेगाचे निरीक्षण करताना पीक संरक्षक तज्ज्ञ.

Web Title: Infestation of pink bollworm on cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.