शेतकरी, शेतमजुरांना महागाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:24 AM2021-07-20T04:24:50+5:302021-07-20T04:24:50+5:30

शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही; मात्र सतत इंधन दरवाढ केल्याने त्याची झळ मालवाहतुकीला बसत आहे. इंधन ...

Inflation hits farmers, farm laborers | शेतकरी, शेतमजुरांना महागाईचे चटके

शेतकरी, शेतमजुरांना महागाईचे चटके

Next

शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही; मात्र सतत इंधन दरवाढ केल्याने त्याची झळ मालवाहतुकीला बसत आहे. इंधन दरवाढ केल्याने त्याचा थेट परिणाम मालवाहतुकीवर झाला. खाद्य तेल, डाळी, चहा, भाज्या, फळे, दूध आदी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. सध्या तर पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर डिझेलही शंभरी पार करण्याच्या उंबरठ्यावर आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर ९०० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. कोरोनामुळे सर्वांचे उत्पन्न घटले. त्यामुळे सामान्य माणूस हतबल झाला आहे. वर्षभरात खाद्यतेलाच्या दरात विक्रमी वाढ झाली. त्यामुळे तेलाची फोडणी महागल्याने सर्वसामान्य गृहिणींचे किचन बजेट कोलमडले. तेल १५० रुपये प्रतिकिलो झाले. रोजीरोटी कमवणाऱ्या गृहिणीलाही महागाची फोडणी कशी परवडत असेल ही कल्पना न केलेली बरी.

Web Title: Inflation hits farmers, farm laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.