पाच हजार हेक्टर क्षेत्रावर रोगाचा प्रादुर्भाव

By admin | Published: October 20, 2016 02:24 AM2016-10-20T02:24:35+5:302016-10-20T02:24:35+5:30

गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात ११२ टक्के पाऊस झाला आहे.

Influence of disease on 5,000 hectare area | पाच हजार हेक्टर क्षेत्रावर रोगाचा प्रादुर्भाव

पाच हजार हेक्टर क्षेत्रावर रोगाचा प्रादुर्भाव

Next

धान उत्पादक शेतकरी अडचणीत : कृषी विभागाचे अधिकारी बांधावर चालले; कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शन
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात ११२ टक्के पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवरील धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धानावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी २९ सप्टेंबरपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात १५११.१ मीमी म्हणजे ११२.१ टक्का पाऊस झाला आहे. गतवर्षी केवळ ७४.२ टक्केच पाऊस जिल्ह्यात झाला होता. म्हणजे १३५४.७ मीमी पाऊस झाला होता. यंदा सतत पाऊस व तेवढ्याच प्रमाणात उकाडा असल्याने वातावरणातील बदलाचा परिणाम थेट खरीप पिकांवर होऊ लागला आहे. जिल्ह्यात मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक खरीप क्षेत्र दोन लाखांच्या वर पोहोचले होते. यंदा वेळेत पाऊस आल्याने उत्पादन चांगले होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र सप्टेंबर महिन्यात वातावरणातील बदल व अतिवृष्टीमुळे पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर धानपीक असून जिल्हाभरात कृषी विभागाने १ लाख ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे प्राथमिक सर्वेक्षण केले. त्यापैकी जवळजवळ ४ हजार ९२ हेक्टर क्षेत्रावरील पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. ३ हजार ४८० हेक्टर क्षेत्रावर फवारणी १६ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली. चामोर्शी तालुक्यात १०९८ हेक्टर, गडचिरोली तालुक्यात ९९५, मुलचेरा तालुक्यात ७५५, धानोरा तालुक्यात ७७२, आरमोरी तालुक्यात १५३, वडसा तालुक्यात ११२, कुरखेडा तालुक्यात १११, कोरची तालुक्यात ६३, अहेरी तालुक्यात १५, सिरोंचा तालुक्यात ९, एटापल्ली तालुक्यात ५ व भामरागड तालुक्यात ४ हेक्टर क्षेत्रावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांमध्ये धान व तूर पिकाचा समावेश आहे. कृषी विभागाचे अधिकारी प्रत्यक्षात शेतावर पोहोचून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Influence of disease on 5,000 hectare area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.