धानावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:00 AM2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:47+5:30

गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक शेतीक्षेत्र चामोर्शी तालुक्यात आहे. या तालुक्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील विसोरा, तुळशी, कोकडी, आरमोरी तालुक्याच्या वैरागडसह बहुतांश भागात हलके, मध्यम व जड प्रतीच्या धानाची लागवड केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेती मशागत करून धानपिकाची लागवड केली.

 Influence of military alley on paddy | धानावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

धानावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

Next
ठळक मुद्देजिल्हाभरातील शेतकरी चिंतेत : अनेक शेतकऱ्यांकडून दोन ते तीनदा पिकावर कीटनाशकाची फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वातावरणातील बदल, दमटपणा व अतिवृष्टीमुळे यंदाच्या खरीप हंगामात धानपिकावर लष्करी अळीसह विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गडचिरोली जिल्ह्यात शेकडो हेक्टर शेतातील धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी दोन ते तिनदा कीटकनाशकाची फवारणी करीत आहेत. रोग १०० टक्के आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक शेतीक्षेत्र चामोर्शी तालुक्यात आहे. या तालुक्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील विसोरा, तुळशी, कोकडी, आरमोरी तालुक्याच्या वैरागडसह बहुतांश भागात हलके, मध्यम व जड प्रतीच्या धानाची लागवड केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेती मशागत करून धानपिकाची लागवड केली. सुरूवातीच्या टप्प्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे धानपिकाची पेरणी लांबली. दरम्यान शेतकऱ्यांनी धडपड करून कसेबसे धानाचे पºहे टाकले. त्यानंतर संततधार पावसाची सुरूवात झाली. धानपिकाची रोवणी आटोपली. मात्र पोळा व गणेश उत्सवानंतरही पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. अशा या दमट वातावरणामुळे व अतिवृष्टीमुळे धानपिकावर लष्करी अळी या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याशिवाय खोडकिडा, करपा, कडाकरपा व इतर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या रोगाचे वेळेत व्यवस्थापन करून धानपिकावरील रोग नष्ट करण्याचा सल्ला आत्मा कार्यालय व कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकºयांना दिला आहे. दरम्यान कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन रोगग्रस्त पिकाची पाहणी करीत आहेत.
पाहणीदरम्यान क्षमतेपेक्षा अधिक पाऊस, प्रखर सूर्यप्रकाशाचा अभाव, दमट वातावरण, अशा अपोषक वातावरणामुळे धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी तज्ज्ञांसह शेतकºयांकडून सांगितले जात आहे. रोगाचा नायनाट करण्यासाठी आता शेतकरी पारंपरिक उपाययोजना करीत नाही. कारण कृषी विभागाच्या कर्मचाºयांकडून ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकºयांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळत नाही. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रत्येक गावात धानपिकावरील रोगांचा नायनाट करण्यासाठी नैसर्गिक उपाययोजनांबाबत माहिती देण्याची गरज आहे. निंबोळीअर्काचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडे शेतकºयांना केले जात असले तरी निंबोळीअर्क कसा बनवायाचा, त्याची मात्रा किती वापरायची, त्याची फवारणी कशी करायची आदीसह विविध बाबींसंदर्भात शेतकºयांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मात्र असे मार्गदर्शन मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी जिल्हा, तालुका व मोठ्या गावाच्या कृषी केंद्रात जाऊन रासायनिक कीटकनाशकाची खरेदी करीत आहेत. कीटकनाशकाची फवारणी धानपिकावर सुरू असून या कामास वेग आला आहे. धानपीक रोगातून वाचविण्याची धडपड सुरू आहे.

रात्रीच्या सुमारास पाने कुरतडून खाण्याचे प्रमाण अधिक
कृषी विभागाच कृषी सहायक, कृषी सेवक व इतर कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन धानपिकाची पाहणी करीत आहेत. त्यांनी केलेल्या निरीक्षणानुसार बºयाच भागातील धानपिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. लष्करी अळीचे पतंग कामगंध सापड्यात एक ते तीन दिवस तसेच प्रत्यक्ष शेतात प्रतीचौरस मीटरला एक याप्रमाणे आढळून आले आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून हे पतंग कमीअधीक प्रमाणात दिसून येत आहेत. ही परिस्थिती धोकादायक आहे. मादी पतंग २०० ते ३०० अंडी रानटी गवतावर अथवा धानावर घालून ते करड्या धाग्याने झाकते. अंडी सात दिवसांपर्यंत उबवून नंतर ती अळी २० ते २५ दिवस रात्रीच्या सुमारास पाने जास्त कुरतडून खातात.

 

Web Title:  Influence of military alley on paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती