शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:21 AM2018-03-28T01:21:54+5:302018-03-28T01:21:54+5:30

आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. लोकांनी या योजनांची माहिती घेऊन याचा लाभ घ्यावा तसेच योजनांची माहिती तलाठी व ग्रामसेवकांनी लोकांपर्यंत पोहोचवावी,.....

Information about government schemes | शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवा

शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवा

Next
ठळक मुद्देउपाध्यक्षांचे आवाहन : गडअहेरी जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वितरण

ऑनलाईन लोकमत
अहेरी : आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. लोकांनी या योजनांची माहिती घेऊन याचा लाभ घ्यावा तसेच योजनांची माहिती तलाठी व ग्रामसेवकांनी लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.
महसूल विभाग, तहसील कार्यालय अहेरीच्या वतीने गडअहेरी जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना मंगळवारी जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत घोरूडे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सभापती सुरेखा आलाम, पोलीस निरीक्षक सतीश होडगर, पोलीस उपनिरीक्षक कुमरे, तालुका समन्वयक प्रकाश दुर्गे, केंद्रप्रमुख सुधाकर घोसरे, विजय खरवडे, बानय्या जंगम, पोलीस पाटील शंकरराव गलबले उपस्थित होते.
मागील जुलै महिन्यात या शाळेत विद्यार्थ्यांना आचार्य नरेंद्र महाराज सेवा संघ अहेरी यांचे कडून शालेय उपयोगी विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.तेव्हा तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन आज पुर्ण करीत मंगळवारी सतरा विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सदर शाळा डिजिटल करण्यासाठी उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दहा हजार रुपये तर विजय खरवडे यांनी पाच हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली प्रास्ताविक विजय खरवडे, संचालन शालिनी चलकलवार यांनी केले तर आभार महेश मुक्कावार यांनी मानले.

Web Title: Information about government schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.