डीबीटीसह योजनांची दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2017 01:37 AM2017-05-21T01:37:41+5:302017-05-21T01:37:41+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या पोटेगाव येथील शासकीय माध्यमिक
पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन : पोटेगाव आश्रमशाळेत पालक मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या पोटेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत नुकताच पालक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या थेट लाभासह विविध योजनांची माहिती देण्यात आली.
पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोनू उसेंडी होते. मेळाव्याचे उद्घाटन पोटेगावचे सरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ओंकारेश्वर सडमाके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सर्व शिक्षा अभियानांतर्गत व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुकरू उसेंडी, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य मीराबाई पोटावी, सुनीता पोटावी, कविता सुरपाम, मुख्याध्यापक गणेशराम खांडवाये आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी डीबीटी योजनेंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या थेट लाभाविषयी, आधार कार्ड, बँक खाते, विविध समित्या तसेच आदिवासी विकास विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती दिली. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ चैतन्यमय व उत्साहवर्धक होण्याच्या दृष्टीने उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शिक्षक ए. डब्ल्यू. बोरकर, संचालन सुधीर शेंडे तर आभार प्राथमिक शिक्षक व्ही. एम. नैैताम यांनी मानले. मेळाव्याला परिसरातील पालक, विद्यार्थी, शाळेतील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी नलिनी कुमरे, एस. आर. मंडलवार, व्ही. एम. बनगिनवार, के. जी. घोसरे, व्ही. एस. देसू, एस. आर. जाधव, व्ही. के. देवतळे, बी. डी. वाळके, एम. जी. वासेकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.