धानोराच्या शिबिरात २२ रक्तदात्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:25 AM2021-07-20T04:25:01+5:302021-07-20T04:25:01+5:30

या शिबिराचे उद्घाटन सीआरपीएफ ११३ बटालियनचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकमतचे संस्थापक संपादक आणि ...

Initiative of 22 blood donors in Dhanora camp | धानोराच्या शिबिरात २२ रक्तदात्यांचा पुढाकार

धानोराच्या शिबिरात २२ रक्तदात्यांचा पुढाकार

googlenewsNext

या शिबिराचे उद्घाटन सीआरपीएफ ११३ बटालियनचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकमतचे संस्थापक संपादक आणि स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पूजन व रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सी.जी. पित्तुलवार, संवर्ग विकास अधिकारी इ.एम.कोमलवार, सीआरपीएफचे द्वितीय कमान अधिकारी राजपाल सिंग, निरीक्षक बालविरसिंग, ठाणेदार पो. निरीक्षक विवेक अहिरे, नायब तहसीलदार धनराज वाकुलकर, सामाजिक कार्यकर्ते सोपानदेव मशाखेत्री, वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र सावसागडे, डॉ. संतोष खोब्रागडे, सीआरपीएफचे डॉ. आदित्य पुरोहित, पुरवठा निरीक्षक चंदू प्रधान आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय एसडीपीओ स्वप्निल जाधव यांनी लोकमत समूहाद्वारे सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. डॉ. मंजुषा लेपसे, डेव्हीड गुरनुले यांनी रक्तदात्यांची तपासणी केली. गडचिरोलीवरून आलेल्या रक्तसंकलन चमूच्या सदस्यांनीही आपली जबाबदारी पार पाडली. या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाचे गणेश कुलमेथे, सीआरपीएफचे सुनील खोब्रागडे, भाऊ पटले आणि लोकमतचे तालुका प्रतिनिधी घनश्याम मशाखेत्री यांनी सहकार्य केले.

(बॉक्स)

८५ वेळा रक्तदान

धानोरा येथील प्रदीप वसंतराव श्रीपदवार (५० वर्ष) यांनी लोकमतच्या या शिबिरात आपले ८५ वे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. त्यांनी आतापर्यंत अनेक गरजू रुग्णांना रक्तदान करून त्यांचा जीव वाचविला. त्यांची ही नियमित रक्तदानाची सवय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

(बॉक्स)

रक्तदानासाठी सरसावले हे दाते

प्रदीप श्रीपदवार, राजीव गुजर, सहदेव ठोसरे, टी. डायस, रामस्वरूप सैनी, चंद्र बहादूर, विनोद कुमार शर्मा, वैभव मांडवे, कोतवाल सोपान, योगेश कुमार, गेंदसिह, मनोज आकनुरवार, भवरलाल, संतोष मलागम, दादाजी परवते, तिमा गुरनुले, सोनाली कांकळवार, प्रवीण चौधरी, मिलिंद जोशी, आशिक मडावी अशा एकूण २२ जणांनी रक्तदान केले.

190721\img-20210719-wa0068.jpg

रक्तदान शिबीराचेउद्घाटन करताना जी डी पंढरीनाथ सोबत एसडीपीओ, तहसीलदार व इतर

Web Title: Initiative of 22 blood donors in Dhanora camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.