दारूमुक्त निवडणुकीसाठी ४३ गावांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:35 AM2021-01-20T04:35:38+5:302021-01-20T04:35:38+5:30

मुलचेरा : गाव विकासासाठी दारूमुक्त निवडणूक गरजेची आहे. यासाठी तालुक्यातील ४३ गावांनी पुढाकार घेत 'ग्रामपंचायत निवडणूक -दारूमुक्त निवडणूक' करण्याचा ...

Initiative of 43 villages for alcohol free elections | दारूमुक्त निवडणुकीसाठी ४३ गावांचा पुढाकार

दारूमुक्त निवडणुकीसाठी ४३ गावांचा पुढाकार

Next

मुलचेरा : गाव विकासासाठी दारूमुक्त निवडणूक गरजेची आहे. यासाठी तालुक्यातील ४३ गावांनी पुढाकार घेत 'ग्रामपंचायत निवडणूक -दारूमुक्त निवडणूक' करण्याचा ठराव घेतला आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवारांना दारूचे वाटप करू देणार नाही, नशेत मतदान करणार नाही, असा निर्धारही या गावांनी केला आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी या गावांनी प्रयत्न सुरू केले आहे.

दारूमुक्त निवडणूक करण्यासाठी तालुक्यातील ४३ गावांनी ठराव घेतला आहे. तुमरगुंडा, मुकली, रेंगेवाही, लोहारा, कोठारी, कोपरअल्ली माल, गोविंदपूर, हरिनगर, हेटळकसा, सुंदरनगर, श्रीरामपूर, कोळसापूर, गणेशनगर, बंदूकपल्ली, देशबंधूग्राम, सुरगाव, अदांगेपल्ली, देवदा, कोलपल्ली, टिकेपल्ली, मथुरानगर, उदयनगर, तरुणनगर, भगवंतनगर, विश्वनाथनगर, विजयनगर, भवानीपूर, देवनगर, धनुर, कांचनपूर, आंबटपल्ली, चिचेळा, नागुलवाही, मच्छीगटा, अडपल्ली माल, अडपल्ली चक, कोडीगाव, गोमणी, गीताली, लगाम, खुदीरामपल्ली, लक्ष्मीपूर, गांधीनगर या ४३ गावांनी ‘ग्रामपंचायत निवडणूक-दारूमुक्त निवडणूक’ करण्यासाठी ठराव घेतला आहे.

बाॅक्स ......

२५ रुग्णांवर उपचार

गडचिरोली : मुक्तिपथ अभियानाच्यावतीने आरमोरी व गडचिरोली येथील तालुका कार्यालयात सोमवारी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन केले होते. दोन्ही क्लिनिकच्या माध्यमातून एकूण २५ रुग्णांनी उपचार घेत दारू सोडण्याचा निर्धार केला. आरमोरीच्या क्लिनिकमध्ये दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या १४ रुग्णांनी क्लिनिकला भेट दिली. गडचिरोली शहरातील बस डेपोजवळील मुक्तिपथ तालुका कार्यालयात ११ रुग्णांनी भेट देऊन उपचार घेतला. दोन्ही तालुका क्लिनिकच्या माध्यमातून एकूण २५ रुग्णांवर उपचार व औषधोपचार करण्यात आला. दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्या जास्तीत जास्त रुग्णांनी क्लिनिकला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Initiative of 43 villages for alcohol free elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.