पाेलिसांच्या पुढाकाराने जिमलगट्टावासीयांची स्वच्छतेकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:43 AM2021-08-18T04:43:15+5:302021-08-18T04:43:15+5:30

गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गावात स्वछता मोहीम राबविण्याची मागणी उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दयानंद बघमारे यांच्याकडे केली. उपविभागीय पोलीस ...

With the initiative of Paelis, the people of Jimalgatta are moving towards cleanliness | पाेलिसांच्या पुढाकाराने जिमलगट्टावासीयांची स्वच्छतेकडे वाटचाल

पाेलिसांच्या पुढाकाराने जिमलगट्टावासीयांची स्वच्छतेकडे वाटचाल

Next

गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गावात स्वछता मोहीम राबविण्याची मागणी उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दयानंद बघमारे यांच्याकडे केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता अभियानाची संपूर्ण रूपरेषा पाेलिसांनी आखून दिली. गावातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्याकरिता गावात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात श्रमदान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर व महिलांकरिता रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली हाेती. रस्त्यावरील संपूर्ण खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात आले. गावात वृक्ष लागवडीकरिता व खड्डे बुजवण्याकरिता वन विकास महामंडळाचे आरएफओ अजेस्वा, वन विभागाचे वन परिक्षेत्राधिकारी नगराडे यांचे सहकार्य लाभले. आराेग्य शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी संगीता मेडी यांनी मदत केली. प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने आपापले घर व परिसर सुंदर व सुव्यवस्थित करून घेतला. उत्कृष्ट स्वच्छता करणाऱ्या कुटुंबांना गाैरविण्यात आले. सरपंच पंकज तलांडी, उपसरपंच वेंकटेश मेडी, सचिव सिडाम, डाॅ. शशिकांत उपागनलावार, संजय गज्जलवार, श्रीनिवास गुडमेलवार, अशोक गज्जामवार, मुकुंद दुर्गे, राजेश ओलेट्टीवार, सुधाकर रापर्तीवार, प्रभाकर यादावार, महेश मद्देरलावार, राकेश सोनी, महेश उल्लीपवार, सागर पडंटेन्टिवार, कृष्णा शानगोंडावार, विक्रम सिंग, हरिपत मडल, राम कीर्तिवार, तिरपती कीर्तिवार यांच्याकडून विजेत्यांना बक्षीस दिले. या स्पर्धेत गावातून प्रथम क्रमांक पूनम बापू मडावी यांनी पटकाविला. त्यांना ग्रामपंचायत जिमलगट्टाकडून एलईडी टीव्ही बक्षीस देण्यात आला. दि्वतीय बक्षीस प्रकाश तलांडी यांना राजेश ओलेटिवार यांच्याकडून कपाट बक्षीस देण्यात आले. तृतीय बक्षीस संदीप चांदावार यांना सुधाकर रापर्तीवार यांच्याकडून मिक्सर देण्यात आला.

160821\314320210815_093017.jpg

जिमलगट्टा पोलिसांच्या पुढाकाराणे स्वाचता मोहीम फोटो LED tv बक्षीस देताना sdpo राहुल गायकवाड

Web Title: With the initiative of Paelis, the people of Jimalgatta are moving towards cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.