दारू व तंबाखूमुक्त गावांसाठी दुर्गम भागातील ग्रामपंचायतींचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:35 AM2021-04-06T04:35:58+5:302021-04-06T04:35:58+5:30
कार्यशाळेत मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मल्लेवार यांनी दारूबंदी कायदा, तंबाखूबंदी व पेसा कायद्यासंदर्भात विस्तृत माहिती दिली तसेच गावात उद्भवणाऱ्या ...
कार्यशाळेत मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मल्लेवार यांनी दारूबंदी कायदा, तंबाखूबंदी व पेसा कायद्यासंदर्भात विस्तृत माहिती दिली तसेच गावात उद्भवणाऱ्या समस्यांवर विचारमंथन करण्यात आले. ग्रामपंचायत दारू व तंबाखूमुक्त राहणे का आवश्यक आहे. निवडणुकीपूर्वी निवडून येणाऱ्या उमेदवारांनी दारू व तंबाखूमुक्त गावाचे वचन दिले होते. त्याची वचनपूर्ती करणे. कोरोनाकाळात खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यामुळे विषाणूचे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. यासाठी गावातून तंबाखू हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणे. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावात अवैध दारूविक्री सुरू असल्यास त्यांना नोटीसच्या माध्यमातून दारूविक्री बंद करण्याचे आवाहन करणे. दारूबंदी असून, तंबाखूविक्री सुरू असल्यास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करणे. गावातील अवैध दारू व तंबाखूविक्री बंद झाल्यास गावाचा विकास होणार याबाबत उपस्थित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत पुरसलगोंदी, गेदा, गुरुपल्ली, बुर्गी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आभार संदीप तलांडे यांनी मानले.