काेराेनामुळे विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाकरिता पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:38 AM2021-09-11T04:38:30+5:302021-09-11T04:38:30+5:30
समाधान शिबिराचे उद्घाटन व समारोप या दोन्ही प्रसंगी प्रमुख अतिथी नगराध्यक्ष योगीता पिपरे उपस्थित हाेत्या. उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे ...
समाधान शिबिराचे उद्घाटन व समारोप या दोन्ही प्रसंगी प्रमुख अतिथी नगराध्यक्ष योगीता पिपरे उपस्थित हाेत्या. उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका वैष्णवी नेताम, पूनम हेमके, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे जिल्हा निमंत्रक मनोहर हेपट व सदस्य उपेंद्र रोहणकर, कुसूम अलाम, विलास निंबोरकर, अकिल शेख, तालुका निमंत्रक उमेश सहारे, स्नेहल महाडोळे, नाशिका गुरनुले उपस्थित हाेते.
नगराध्यक्षांनी भोजनाची व्यवस्था केली होती. खूबचंद धर्मशाली यांनी साडी चोळी भेट दिली. रवी व सिमरन धर्मशाली यांनी आपल्या शुभ हस्ते साडीचोळी व भिंतीवरील घड्याळ भगिनींना भेट स्वरुपात प्रदान केली.
महिलांची नोंदणी करुन त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. शासन आपल्या दारी, मिशन वात्सल्य या योजनेची माहिती देण्यात आली. प्रशासनाच्या वतीने पी. पी. पदा व सत्यनाराण अनमदवार यांनी शासकीय याेजनांची माहिती दिली. उपस्थित महिलांनी समारोपानंतर आपापले मनोगत व्यक्त केले. घराच्या बाहेर पडण्याची संधी मिळाली व आपसांत भेटून दुःख व्यक्त करता आले त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. काेराेनावर उपचार करताना ज्यांचा दवाखान्याचा खर्च एक लाख रुपये पेक्षा जास्त झाला अशा महिलांकडून सर्वेक्षण फॉर्म भरून घेण्यात आले. सर्व विधवा महिला २५ ते ४५ या वयोगटातील होत्या. त्यांचे शिक्षण दहावी ते पदवीधर पर्यंतचे आहे.