गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यात आढळला आजारी अवस्थेतील बेवारस उंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:14 PM2018-03-09T13:14:28+5:302018-03-09T13:14:44+5:30

चंद्रपुर जिल्ह्यात जखमी वाघ आढळून तब्बल पाच दिवस लोटूनही त्याच्यावर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यातील बोळढा गट ग्राम पंचायतीअंतर्गत टोली येथील शेतशिवारात मागील अनेक दिवसांपासून जखमी व आजारी स्थितीतील एक उंट आढळला आहे.

Injured camel found in Desaiiganj taluka of Gadchiroli | गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यात आढळला आजारी अवस्थेतील बेवारस उंट

गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यात आढळला आजारी अवस्थेतील बेवारस उंट

googlenewsNext
ठळक मुद्देउंट कोणाच्या मालकीचा हा प्रश्न अनुत्तरीत

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: चंद्रपुर जिल्ह्यात जखमी वाघ आढळून तब्बल पाच दिवस लोटूनही त्याच्यावर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यातील बोळढा गट ग्राम पंचायतीअंतर्गत टोली येथील शेतशिवारात मागील अनेक दिवसांपासून जखमी व आजारी स्थितीतील एक उंट आढळला आहे. हा उंट कोणाच्या मालकीचा आहे याबाबत गावकºयांना कुठलीही माहिती नाही. त्यामुळे या आजारी उंटावर कोण उपचार करणार व त्याचा जीव वाचवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून राजस्थानातील मेंढपाळ त्यांच्या शेळ््या व उंटांना घेऊन फिरतीवर असतात. त्यापैकीच कुणीतरी हा उंट येथे सोडून गेला असावा अशी चर्चा आहे. येथील उपसरपंच कमलेश बारस्कर व अजय तसेच गौरव नागपूरकर यांनी या उंटाची पाहणी केली. पाय मोडलेला हा उंट एकाच जागी बसून राहतो असे दिसले. वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र चांदेकर व डॉक्टर मेश्राम यांनी त्याच्यावर दोन दिवस प्राथमिक उपचार करणार असल्याची माहिती दिली आहे.

Web Title: Injured camel found in Desaiiganj taluka of Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.