महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना निराेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:30 AM2021-01-02T04:30:08+5:302021-01-02T04:30:08+5:30

गडचिराेली : जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्त सत्कार शुक्रवारी अपर जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांच्या हस्ते करण्यात ...

Injury to revenue officers and employees | महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना निराेप

महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना निराेप

Next

गडचिराेली : जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्त सत्कार शुक्रवारी अपर जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यालयातर्फे सत्कार करून त्यांना निराेप देण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार (निवडणूक) सुनील चडगुलवार, नायब तहसीलदार बालाजी साेपनकर (राेहयाे) व शिपाई वासुदेव काेल्हटकर हे सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने सत्कार समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी अनंत वालस्कर हाेते. प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी जी. एम. तळपाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) धनाजी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे उपस्थित हाेते. अपर जिल्हाधिकारी वालस्कर यांच्या हस्ते चडगुलवार, साेपनकर व काेल्हटकर यांचा शाल, श्रीफळ, साडी व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच निवडणूकविषयक, काेविड, राेजगार हमी याेजनेच्या कार्याबद्दल गाैरव करण्यात आला. या कार्यक्रमात चडगुलवार व साेपनकर यांनी शासकीय सेवेत केलेल्या कामातील अनुभव सांगितले, तर राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस भास्कर मेश्राम, जि. प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, चतुर्थश्रेणी संघटनेचे अध्यक्ष लतीफ पठाण यांनीही संघटनेतील याेगदान व प्रशासकीय कार्याबाबत सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गाैरवपूर्ण उल्लेख केला. कार्यक्रमाला संघटनेचे सहसचिव ईश्वर साेनटक्के, तहसीलदार रामटेके, नायब तहसीलदार गाैरीशंकर चव्हाण, किशाेर भांडारकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सहारे उपस्थित हाेते. नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर यांनी सूत्रसंचालन केले, तर धीरज जुमनाके यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी जिल्हा नाझर ज्ञानेश्वर ठाकरे, आशिष साेरते, प्रवीण आदे, शेषराव बघमारे, कृष्णा नैताम, कल्पेश बारापात्रे, विशाल खडतरे, राजेंद्र धुळसे, विवेक दुधबळे, सुरेंद्रसिंह चव्हाण, दीपक लाकुडवाहे, नामदेव भुरले यांनी सहकार्य केले.

Web Title: Injury to revenue officers and employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.