केंद्र प्रमुखांवर बदलीत अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:37 AM2018-06-15T00:37:59+5:302018-06-15T00:37:59+5:30
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये काही केंद्र प्रमुखांनी यापूर्वी दुर्गम भागात सेवा केली असतानाही त्यांची बदली आणखी दुर्गम भागातच करण्यात आली आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये काही केंद्र प्रमुखांनी यापूर्वी दुर्गम भागात सेवा केली असतानाही त्यांची बदली आणखी दुर्गम भागातच करण्यात आली आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्र प्रमुख संघाने मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यामध्ये बी. यू. खोब्रागडे, के. आर. शेंडे, वाय. ए. कोमरेवार या तीन केंद्र प्रमुखांची दुर्गम भागात सेवा झाली आहे. त्यामुळे त्यांना सुगम भागात नियुक्ती देणे आवश्यक होते. मात्र त्यांची बदली दुर्गम भागातच करण्यात आली आहे. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली असता, विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करून त्यांच्या परवानगीने योग्य बदल्या केल्या जातील, असे आश्वासन दिले. यावेळी राठोड यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम मेश्राम, सरचिटणीस दिलीप मुपीडवार, सहसचिव सदानंद ताराम, कार्याध्यक्ष राजू वडपल्लीवार, कोषाध्यक्ष विजय बन्सोड, तालुकाध्यक्ष बंडू खोब्रागडे, येलेश्वर कोमरेवार, किरण शेंडे आदी केंद्र प्रमुख उपस्थित होते.