वनवे थांबविण्यासाठी वनविभागाची नाविण्यपूर्ण उपाययाेजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 05:00 AM2021-03-12T05:00:00+5:302021-03-12T05:00:37+5:30
जंगलांना आग लागण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोह फुलाचा हंगाम सुरू झाला की मोहफुलं वेचणारे लोक झाडाखालील पालापाचोळा गोळा करतात. त्या कचऱ्याला त्याच ठिकाणी जाळून तो न वीजवता घरी निघून जातात. ही आग पसरत जाऊन संपूर्ण जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी येते. यात वनांचे आणि वन्यजीवांचे फार मोठी हानी होते. दरवर्षी लागणाऱ्या हानीमुळे पर्यावरणाची अपरिमित हानी हाेते. हे टाळण्यासाठी या वर्षात वन विभागाने स्वतः मोह फुलाच्या झाडा खालील पालापाचोळा ब्लोअर मशीनद्वारे गाेळा केला जात आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : मार्च महिना सुरू झाल्यानंतर जंगलांनाआगी लागण्याचे प्रकार आणि जिल्ह्यात मोहफुल वेचणीचा हंगाम लक्षात घेता जंगलांनाआगी लागण्याचे प्रमाण वाढू नये म्हणून वनविभागाने झाडाखालील पालापाचोळा ब्लोअर मशीनद्वारे नष्ट करण्याची मोहिम हाती घेतली आहे वैरागड उपवन क्षेत्रात ही मोहीम वन विभागाचे अधिकारी कर्मचारी राबवितत आहेत.
जंगलांना आग लागण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोह फुलाचा हंगाम सुरू झाला की मोहफुलं वेचणारे लोक झाडाखालील पालापाचोळा गोळा करतात. त्या कचऱ्याला त्याच ठिकाणी जाळून तो न वीजवता घरी निघून जातात. ही आग पसरत जाऊन संपूर्ण जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी येते. यात वनांचे आणि वन्यजीवांचे फार मोठी हानी होते. दरवर्षी लागणाऱ्या हानीमुळे पर्यावरणाची अपरिमित हानी हाेते. हे टाळण्यासाठी या वर्षात वन विभागाने स्वतः मोह फुलाच्या झाडा खालील पालापाचोळा ब्लोअर मशीनद्वारे गाेळा केला जात आहे. नंतर ताे कचरा जाळून टाकण्याचा मोहीम उघडली आहे. स्वतः वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वन मजूर जंगलात असणाऱ्या मोहफुलाच्या झाडा खालील पालापाचोळा स्वतः नष्ट करीत आहेत. त्यामुळे लोकांना मोह फुलाखालील जागा स्वच्छ करण्यासाठी पालापाचोळ्याचे जाळण्याची गरज पडणार नाही. तरीही पालापाचाेळा स्वताहून जाळून ती आग जंगलात पसरल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे पत्र वन विभागाने काढले आहे. वैरागड उपवन क्षेत्रात क्षेत्र सहायक साईनाथ सोनुले, वनरक्षक विकास शिवणकर, विनोद कवडो, नारायण शिवरकर, प्रवीण धात्रक वणव्यांना प्रतिबंध घालण्यासाठी काळजी घेत आहेत. त्यामुळे वनव्यांचे प्रमाण यावर्षी कमी हाेईल, अशी अपेक्षा वनकर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जंगलात गस्ती वाढल्या
जंगलांना लागणाऱ्या आगीवर प्रतिबंध घालण्यासाठी वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी पहाटेपासूनच जंगलात गस्त घालत आहेत. गावागावात वनव्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी यांना याबाबत सूचना देऊन जंगलांना आगी लागण्याचे कोणी जर अघोरी कृत्य करत असेल तर त्याला तात्काळ वन विभागाला कळवावे यासाठी मोबाइल नंबर सुद्धा वन विभागाने प्रसिद्ध केले आहेत. काही तेंदू ठेकेदार आपल्या मजुरांकरवी जंगलांना मुद्दाम आगी लावतात. अशा कंत्राटदारावरही कारवाई केली जााणार आहे.