भामरागड पंचायत समितीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करा

By admin | Published: May 16, 2016 01:29 AM2016-05-16T01:29:10+5:302016-05-16T01:29:10+5:30

येथील नगर पंचायतीच्या कामांमध्ये मुख्याधिकारी परसे यांनी २३ लाख ३३ हजार ५८२ रूपयांचा गैरव्यवहार केला असून या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी,

Inquire about corruption in Bhamragad Panchayat Samiti | भामरागड पंचायत समितीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करा

भामरागड पंचायत समितीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करा

Next

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : हरिदास रापेल्लीवार यांची मागणी
भामरागड : येथील नगर पंचायतीच्या कामांमध्ये मुख्याधिकारी परसे यांनी २३ लाख ३३ हजार ५८२ रूपयांचा गैरव्यवहार केला असून या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भामरागड पंचायत समितीचे बांधकाम सभापती हरिदास रापेल्लीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगर पंचायतची निर्मिती झाल्यापासून प्रत्येक मासिक सभेत जमा खर्चाचा हिशोब मुख्याधिकाऱ्यांना विचारण्यात आला. मात्र ते जमा खर्चाचा हिशोब दाखविण्यास तयार होत नाही. २४ एप्रिल रोजी हिशोब मागितला असता, त्यांनी अवाढव्य खर्च मासीक सभेत सादर केला. बेजूर गावाकरिता राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत २ लाख ६८ हजार १६३ रूपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला. यातील ९० हजार रूपये मुख्याधिकारी व लिपीक जितेंद्र मडावी यांनी स्वहितासाठी वापरले. सदर रक्कम काढल्याबाबत मासीक सभेत कोणताच प्रस्ताव मंजूर नाही. आदेश नसताना बँकेतून पैसे काढता येतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांकडून ४ लाख ६७ हजार ७६८ एवढा गृहकर वसूल केला. ही रक्कम सामान्य फंड म्हणून दाखविली आहे व यातून अनेक खर्च दाखविण्यात आले आहेत. जमा रक्कमेपेक्षा खर्च १० लाख ७१ हजार ६४२ एवढा दुपटीने दाखविला आहे. खर्चाचा रेकॉर्ड लिहिला नाही. कॅशबूक प्रमाणिक करून घेतले नाही. १४ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेला १ कोटी ४२ लाख २५ हजार ५६० रूपये एवढा निधी बँकेत जमा होता. त्यापैकी प्रशासकीय खर्च ११ लाख ७९ हजार २० रूपये हातपंप दुरूस्तीचा खर्च ८२ हजार ९२० दाखविला आहे. या संदर्भातचा कोणताही रेकॉर्ड नसल्याचा आरोप हरिदास रापेल्लीवार यांनी केला आहे. निवेदनावर भामरागड नगर पंचायत अध्यक्ष राजू वड्डे, उपाध्यक्ष शारदा कंबगोणीवार, पाणी पुरवठा सभापती शंकर आत्राम यांनीही सह्या केल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)

भामरागड नगर पंचायतीत कोणताही गैरव्यवहार झाला नाही. मासिक सभेमध्ये सर्व हिशोब द्यायला तयार आहो. स्थायी मुख्याधिकारी, अभियंता, सॅनिटरी इन्स्पेक्टर व इतर कर्मचारी नियुक्त केल्याशिवाय न.पं.चा कारभार सुरळीत होऊ शकणार नाही. मला नगर पंचायतीच्या कामाचा अनुभव नसून पदाधिकारी सुध्दा नवीन आहेत. आवक-जावक व कॅशबूक लिहिण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही बाब आपण मान्य करतो. जमा खर्चाचा हिशोब जोडत नसल्याने अफरातफर झाल्याचा संशय त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. अनुभवी अभियंता व लेखापाल उपलब्ध झाल्यास आपण सर्व हिशोब देण्यास तयार आहे. जमा खर्च लिहिण्यासाठी जुने ग्रामसेवक मराठे यांना उपलब्ध करून देण्याची मागणी बीडीओंकडे पत्रान्वये केली आहे.
- हिरामण परसे, मुख्याधिकारी,
नगर पंचायत भामरागड

Web Title: Inquire about corruption in Bhamragad Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.