जलयुक्त शिवारच्या कामांची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:04 AM2017-11-08T00:04:45+5:302017-11-08T00:05:05+5:30
एटापल्ली तालुक्यातील झारेवाडा येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमितता असल्याने या संपूर्ण कामांची चौकशी करावी, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील झारेवाडा येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमितता असल्याने या संपूर्ण कामांची चौकशी करावी, अशी मागणी झारेवाडा येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षात कृषी अधिकारी कार्यालय एटापल्लीमार्फत झारेवाडा गावात नवीन बोडी, मजगीच्या कामांची निवड करण्यात आली. ही कामे करण्यासाठी गावात सभा घेण्यात आली. प्रत्येक शेतकºयांच्या जमिनीचा सर्वे करून एकूण बांध्यांची संख्या व नवीन बोडी याबाबतची माहिती दिली होती. बोडीची लांबी १०० मीटर व उंची तीन मीटर राहिल, असे सांगितले होते. परंतु बोडींचे काम व्यवस्थित झाले नाही. बोडी दुरूस्तीसाठी ४५ हजार रूपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र ट्रॅक्टरने केवळ दोन ते चार तास काम केले.
लुला गावडे यांच्या शेतात एकूण २४ बांध्या तयार करण्यास मंजुरी मिळाली. मात्र प्रत्यक्षात तिनच बांध्या बनविण्यात आल्या. लालू नरोटी यांच्या शेतात २६ बांध्या मंजूर आहेत. मात्र १९ बांध्यांची काम करण्यात आले. असा आरोप निवेदनातून केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनावर देवू गोटा, मासा नरोटी, पुसू नरोटी, मुरा गोटा, लालू नरोटी, चेका कोवाशी, चेका नरोटी, पांडू नरोटी, डोल्या गावडे, तुला गावडे, गादो गोटा, जोगा गोटा यांच्या स्वाक्षºया आहेत.
याबाबत एटापल्लीचे तालुका कृषी अधिकारी हडपे यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.