धानावर किडीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:39 AM2021-09-18T04:39:29+5:302021-09-18T04:39:29+5:30
कृषी क्षेत्र संपूर्ण हवामानाशी निगडित असल्याने शेतकऱ्यांना यथायोग्य मार्गदर्शन करून नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात ...
कृषी क्षेत्र संपूर्ण हवामानाशी निगडित असल्याने शेतकऱ्यांना यथायोग्य मार्गदर्शन करून नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात कृषी सेवकापासून ते पंचायत समिती स्तरावर कृषी विस्तार अधिकारी, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी अशा कृषी विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्राशी निगडित इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांना पुरवून मशागत, कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या विभागावर आहे.
यासाठी कृषी क्षेत्राशी निगडित ज्ञान असलेल्या व त्याचे शिक्षण व प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींनाच या विभागात नियुक्त्या देण्यात येतात. शेतकऱ्यांना उपलब्ध हाेणारे बी-बियाणे, रासायनिक खते यांचा योग्य वापर करण्यासंदर्भात कृषी विभागाचे यथायोग्य मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.