बालकांसह ९ लाख ६३ हजार लाेकांना दिल्या जंतनाशक गाेळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:42 AM2021-09-15T04:42:43+5:302021-09-15T04:42:43+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील शाळा अजूनही विद्यार्थ्यांविना ऑनलाइन सुरू आहेत. केवळ ग्रामीण भागातील ...

Insecticides were given to 9 lakh 63 thousand people including children | बालकांसह ९ लाख ६३ हजार लाेकांना दिल्या जंतनाशक गाेळ्या

बालकांसह ९ लाख ६३ हजार लाेकांना दिल्या जंतनाशक गाेळ्या

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील शाळा अजूनही विद्यार्थ्यांविना ऑनलाइन सुरू आहेत. केवळ ग्रामीण भागातील शाळा काही दिवसांपूर्वी सुरू झाल्या. आराेग्य विभागाच्यावतीने दरवर्षी शाळांमध्ये जाऊन एक वर्षावरील सर्व बालकांना जंतनाशक गाेळ्या वितरित केल्या जात होत्या. मात्र यावर्षी हत्तीराेग निर्मूलन व जंतनाशक गाेळ्या ऑगस्ट महिन्याच्या पंधरवड्यात वितरित करण्यात आल्या.

१ ते १५ ऑगस्टदरम्यान आराेग्य विभागाच्यावतीने आशावर्कर व एएनएममार्फत आयडीए कार्यक्रम राबवून गाेळ्या वितरित करण्यात आल्या. एक वर्षावरील बालकांसह जिल्ह्यातील एकूण ९ लाख ६३ हजार ८७६ जणांना हत्तीपाय व जंतनाशक गाेळ्यांचे वितरण करण्यात आले.

जिल्ह्यातील ११ लाख ४० हजार ८०२ इतक्या लाेकसंख्येपैकी १० लाख ६० हजार ९५३ जण गाेळ्या खाण्यासाठी पात्र असल्याबाबतचे नियाेजन प्रशासनातर्फे करण्यात आले. दरम्यान, गर्भवती महिला व गंभीर आजारी रुग्ण वगळता ९६ लाख ६३ हजार जणांना गाेळ्या दिल्या.

बाॅक्स...

काय आहे जंतदाेष

- महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांत आशावर्कर व एएनएममार्फत जंतनाशक गाेळ्या देण्याची माेहीम राबविण्यात आली. मुलांना जंत किंवा कृमीदाेष झाला की त्याची प्रकृती बिघडते.

- जंत तसेच कृमीदाेष झाल्यावर मुलांना हगवण लागणे, पाेटात दुखणे, शाैचातून जंतू बाहेर निघणे तसेच ताप येणे आदी लक्षणे दिसून येतात.

- जंत किंवा कृमीदाेष झाल्यावर मुला, मुलींची प्रकृती ढासळते. वेळीच औषधाेपचार केल्यास प्रकृती सुधारते. त्यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे.

बाॅक्स...

जंत हाेण्याची प्रमुख कारणे

- व्यक्तिगत व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे, कृमी दाेषांचा संसर्ग दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने हाेताे. बालकांमध्ये हाेणारा दीर्घकालीन कृमीदाेष हा व्यापक आणि मुलांना अशक्त करणारा आहे.

- कृमीदाेष हा रक्तक्षय व कुपाेषणाचे कारण तर आहेच. तसेच बालकांची बाैद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे कारण देखील ठरते. कृमी आढळणारी मुले ही कायम अशक्त व थकलेली असतात. ते अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाही. अशा मुलांची काळजी घेणे गरजेचे ठरते.

बाॅक्स...

९०.८५ टक्के लाेकांनी केले गाेळ्यांचे सेवन

आयडीए कार्यक्रमाअंतर्गत ॲल्बेन्डाझाेल या गाेळ्यांचे वितरण १ ते १५ ऑगस्टदरम्यान करण्यात आले. काेरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमाेरी, धानाेरा, गडचिराेली, चामाेर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिराेंचा या बाराही तालुक्यात एकूण ८ लाख ७२ हजार ३८४ जणांना गाेळ्यांचे वाटप करण्यात आले. याची टक्केवारी ९१.०३ आहे. याशिवाय देसाईगंज व गडचिराेली नगर परिषदेच्या हद्दीतही गाेळ्यांचे वाटप करण्यात आले. न.प.क्षेत्र व ग्रामीण भाग मिळून एकूण ९०.८५ टक्के लाेकांना गाेळ्यांचा डाेस देण्यात आला. आराेग्य विभागाच्यावतीने ही माेहीम यशस्वी करण्यात आली. यात हत्तीराेग व हिवताप विभागाचे सहकार्य लाभले.

काेट...

१ ते ५ ऑगस्टदरम्यान गडचिराेली जिल्ह्यात आशावर्कर व एएनएममार्फत हत्तीपाय व जंतनाशक गाेळ्या वितरणाची माेहीम राबविण्यात आली. प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्र व उपकेंद्रामार्फत नियाेजन करून ९ लाख ६३ हजारपेक्षा अधिक जणांना गाेळ्या देण्यात आल्या.

- डाॅ. समीर बन्साेडे, जिल्हा माता व बाल संगाेपन अधिकारी, गडचिराेली

Web Title: Insecticides were given to 9 lakh 63 thousand people including children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.