मागण्यांसाठी विमाशिसंचे धरणे

By admin | Published: July 3, 2016 01:29 AM2016-07-03T01:29:00+5:302016-07-03T01:29:00+5:30

खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खासगी आश्रमशाळा, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी

For insertion of insurers | मागण्यांसाठी विमाशिसंचे धरणे

मागण्यांसाठी विमाशिसंचे धरणे

Next

शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : सेवा समाप्त केलेल्या शिक्षकांना सेवेत पूर्ववत करा
गडचिरोली : खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खासगी आश्रमशाळा, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
संच मान्यतेबाबतचा २८ आॅगस्ट २०१५, ८ जानेवारी व २७ मे २०१६ आदी तिन्ही शासन निर्णय अधिग्रहीत करून नव्याने सशक्त, शिक्षकांना पुरक व अन्यायकारक नसलेला एकच निर्णय घेण्यात यावा, संच मान्यतेचे जुने निकष कायम ठेवावे, जुनी पेंशन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिलेल्या खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या अनुदानासाठी पात्र ठरवावे, त्यांना १०० टक्के अनुदान घोषित करावे, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या सातव्या आयोगाच्या संभाव्य वेतन विषय शिफारशी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भी पावसाळी अधिवेशनात निधीची तरतूद करावी, अतिरिक्त कारणाने सेवा समाप्त केलेल्या शिक्षण सेवकांना सेवेत पूर्ववत करावे आदी मागण्यांचे निवेदन प्रभारी शिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना पाठविण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, अजय लोंढे, शेमदेव चाफले, सुरेंद्र मामिडवार, यशवंत रायपुरे, संजय खांडरे, संजय दौरेवार, संजय चांदेकर, रवींद्र बांबोळे, संजय घोटेकर, पुरूषोत्तम उरकुडे, भोयर, ढगे, महेंद्र वाकडे, हंसराज लांडगे, रेवनाथ लांजेवार, अनिल गांगरेड्डीवार, यादव बानबले, नागापुरे हजर होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: For insertion of insurers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.