विठ्ठलरावपेठाची समितीकडून पाहणी
By Admin | Published: September 29, 2016 01:41 AM2016-09-29T01:41:15+5:302016-09-29T01:41:15+5:30
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील राज्यस्तरीय गोदरीमुक्त समितीने तालुक्यातील
राज्यस्तरीय पथक : हागणदारीमुक्त गाव, गटार आदी तपासले
सिरोंचा : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील राज्यस्तरीय गोदरीमुक्त समितीने तालुक्यातील विठ्ठलरावपेठा गावाला भेट देऊन तेथील शौचालय बांधकाम, स्वच्छतेची साधणे, शाळा, अंगणवाडी, सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था, शोष खड्डे, गटारे, पिण्याच्या पाण्याची निगा आदी बाबींची तपासणी केली.
राज्यस्तरीय समितीमध्ये अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर पटले, सदस्य शारदा कावळे, अनवर शेख, विठ्ठलरावपेठाच्या सरपंच समक्का, प्राशिष कोंडबत्तुनवार, मनुष्यबळ विकास सल्लागार योगेश फुसे, क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल मडावी, पंचायत विस्तार अधिकारी परशुरामकर, माकडे, ग्रामसेवक बदोले, गट समन्वयक श्रीनिवास अक्केला, समूह समन्वयक नरेंद्र पेंड्याल तसेच ग्रा. पं. पदाधिकारी, जिल्हास्तरावरील स्वच्छता मिशन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी राज्यस्तरीय समिती सदस्यांनी स्वच्छता व शुद्ध पाणीपुरवठ्याबाबत ग्रापं. पदाधिकारी व ग्रामस्थांना मार्गदर्शनही केले. (शहर प्रतिनिधी)