दस्तावेजांच्या तपासणीने शिक्षकांमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 10:09 PM2017-11-05T22:09:08+5:302017-11-05T22:09:18+5:30
संवर्ग १ व २ मध्ये मोडणाºया शिक्षकांच्या दस्तावेजांची तपासणी करण्याचे निर्देश ग्राम विकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे अर्जामध्ये चुकीची माहिती सादर करणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : संवर्ग १ व २ मध्ये मोडणाºया शिक्षकांच्या दस्तावेजांची तपासणी करण्याचे निर्देश ग्राम विकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे अर्जामध्ये चुकीची माहिती सादर करणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.
बदली प्रक्रिया राबविण्यासाठी ग्राम विकास विभागाने शिक्षकांकडून आॅनलाईन अर्ज भरून मागितले होते. अर्ज भरतेवेळी शिक्षकाला केवळ माहिती भरायची होती. मात्र त्या अर्जासोबत कागदपत्रे अपलोड करायची नव्हती. याचा गैरफायदा काही शिक्षकांनी घेतला. संवर्ग १ मध्ये अपंग, विधवा, कुमारिका, अपंग पाल्यांचे वडील यांचा समावेश होतो. तर संवर्ग २ मध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाचा समावेश होतो. या दोन्ही संवर्गाची प्रक्रिया पार पडली असून बदलीपात्र शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेकांनी चुकीची माहिती भरून बदलीचा लाभ उचलला असल्याची प्रकरणे काही जिल्ह्यांमध्ये लक्षात आली आहेत. त्यामुळे जे शिक्षक ज्या कारणास्तव बदलीपात्र ठरले आहेत. त्यांच्या प्रमाणपात्रांची तपासणी करावी, असे निर्देश ग्राम विकास विभागाने संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाºयांना दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकाºयांनी गट शिक्षणाधिकाºयांना पत्र दिले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत अजूनपर्यंत पत्र निघाले नसले तरी काही दिवसातच असे पत्र काढले जाईल, हे निश्चित आहे.
गडचिरोली जिल्ह्यात शिक्षकांच्या बदलीचा मुद्दा अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे बदलीचा लाभ उचलण्यासाठी जिल्ह्यातीलही शिक्षकांनी चुकीची माहिती अर्जात सादर केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बदलीपात्र ठरलेल्या शिक्षकांची चौकशी करावी, अशी मागणी आहे.
महिला पोलीस पाटलाचा शिक्षक पती ठरला पात्र
पती-पत्नी एकत्रीकरणासाठी संबंधित शिक्षकाची पत्नी सरकारी नोकरीतच असणे आवश्यक आहे. मात्र पोलीस पाटील, अंगणवाडी मदतनिस, अंगणवाडी सेविका, वॉचमन आदी मानधन तत्वावर नोकरी करीत असलेल्या पत्नींच्या शिक्षक पतीराजांनी संवर्ग २ साठी अर्ज केला असल्याचे उघड झाले आहे. मानधन तत्वावर काम करीत असलेल्या पत्नीसाठी पती-पत्नी एकत्रीकरणाचा मुद्दा लागू होत नाही. ही बाब शिक्षकांना चांगल्या पध्दतीने माहित असतानाही त्यांनी जाणूनबुजून दिशाभूल करणारी माहिती भरली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. संबंधित शिक्षकांनी विवाहाचा पुरावा टाकला नाही. काहिंनी नमणूक आदेश टाकले नाही. कार्यरत ठिकाण व मुख्यालयापासूनचे अंतरही टाकले नाही. तरीही संबंधित शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.
बदली प्रक्रियेत आणखी एक विघ्न
बदली प्रक्रिया गतिमान करण्याचा प्रयत्न ग्राम विकास विभागाकडून चालविला जात आहे. मात्र प्रत्येक टप्प्यावर अडचणी येत आहेत. संवर्ग १ व २ मध्ये मोडणाºया बदलीपात्र शिक्षकांची यादी अंतिम समजली जात होती. मात्र यादी झळकताच संबंधित शिक्षकांसदर्भात आक्षेप सुरू झाले आहे. आता दस्तावेजांची तपासणी केली जाणार असल्याने बदलीची प्रक्रिया आणखी लांबणीवर पडणार आहे.
काही जिल्ह्यांमध्ये संवर्ग १ व २ च्या बदलीपात्र शिक्षकांच्या दस्तावेजांची तपासणी करण्याचे निर्देश संबंधित शिक्षणाधिकाºयांनी दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात संवर्ग १ व २ च्या बदल्यांची प्रक्रिया दुसºया टप्प्यात उशीराने राबविली जाणार आहे. दस्तावेजांची तपासणी करण्याबाबत अजूनपर्यंत आपल्याला पत्र प्राप्त झाले नाही. पत्र मिळाल्यानंतर तशा प्रकारचे पत्र काढले जाईल.
- जयंत बाबरे, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी