प्राणहितेवरील पूल बांधकामाची पाहणी

By admin | Published: June 2, 2017 01:02 AM2017-06-02T01:02:31+5:302017-06-02T01:02:31+5:30

सिरोंचा शहरानजीक धर्मपूरी येथील प्राणहिता नदीवर पूल बांधकाम सुरू आहे. आदिवासी विद्यार्थी संघाचे सल्लागार

Inspection of the living bridge construction survey | प्राणहितेवरील पूल बांधकामाची पाहणी

प्राणहितेवरील पूल बांधकामाची पाहणी

Next

माजी आमदार कामाच्या ठिकाणी पोहोचले : पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा शहरानजीक धर्मपूरी येथील प्राणहिता नदीवर पूल बांधकाम सुरू आहे. आदिवासी विद्यार्थी संघाचे सल्लागार तथा अहेरीचे माजी आ. दीपक आत्राम यांनी या पूल बांधकामाच्या ठिकाणी बुधवारी पोहोचून कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी जि. प. सदस्य अनिता आत्राम, आविसंचे पदाधिकारी मंदा शंकर, माजी उपसभापती आकुला मल्लीकार्जुनराव, आविसंचे अहेरी तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, रवी सल्लम, रवी बोंगोनी, मारोती गागापुरपू, श्याम बेझलवार आदींसह आविसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे आमदार असताना दीपक आत्राम यांनी सिरोंचानजीकच्या धर्मपुरीजवळ प्राणहिता नदीवर पूल बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी केली. सदर पूल बांधकामासाठी दीपक आत्राम यांनी आर. आर. पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून तत्कालीन राज्य सरकारने या पुलाच्या बांधकामास मंजुरी प्रदान केली. याशिवाय चिंतनपल्ली गावानजीकच्या गोदावरील पूल बांधकामासही तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी मंजुरी प्रदान केली. सद्य:स्थितीत प्राणहिता नदीवरील पुलाचे बांधकाम गतीने सुरू आहे. माजी आ. दीपक आत्राम यांनी पाहणीदरम्यान या पुलाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना वाहतुकीची सोय होणार आहे.

Web Title: Inspection of the living bridge construction survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.