महागावातील लसीकरण तालुक्यासाठी प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:25+5:302021-07-07T04:45:25+5:30
अहेरी तालुक्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी लसीकरण ...
अहेरी तालुक्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी लसीकरण करणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून समूह प्रतिकारशक्ती तयार होऊन कोरोनाच्या प्रकोपाला आळा घालू शकतो. ग्रामीण भागात आजही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत अनेक अफवा आहेत. त्यामध्ये नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती आवश्यक आहे. अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी महागाव बु. व महागाव खु. येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी महागाव (बु.) सरपंच पुष्पा मडावी, उपसरपंच संजय अलोणे, सदस्य विनायक वेलादी, राजू दुर्गे, सोनी गर्गम, दीपाली कांबळे, संगीता आत्राम, लालू वेलादी उपस्थित होते.
030721\14472001img-20210703-wa0182.jpg
लसीकरण करतेवेळी तहसीलदार ओंकार ओतारी श ग्रा प पदाधिकारी