राष्टÑसंतांच्या सहवासाने जगण्याची प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:12 AM2017-10-13T00:12:43+5:302017-10-13T00:13:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : भरदार देहयष्टी, अंगात खादीचा कुर्ता, डोक्यात टोपरा, खड्या आवाजातील राष्टÑसंत तुकडोजी महाराजांची भजने आणि त्यांचे मानवतावादी विचार प्रत्येक व्यक्तीला जगण्याची नवी उमेद निर्माण करून देतात, असे विचार राष्टÑसंतांचा सहवास लाभलेले रामचंद्र तावेडे यांनी लोकमत प्रतिनिधीसमोर व्यक्त केले.
राष्टÑसंत तुकडोजी महाराज हे वैरागड, कोसबी, सोनसरी, विसोरा, देसाईगंज, आमगाव, आरमोरी येथे जनजागृतीच्या कार्यक्रमांसाठी येत होते. यावेळी त्यांची राष्टÑसंत तुकडोजी महाराजांची ओळख झाली होती. पुढे माहिती देताना तावेडे म्हणाले, राष्टÑसंतांसोबत छायाचित्र काढले. सदर छायाचित्र अजूनही राष्टÑसंतांच्या स्मृती जागृत करते. तत्कालीन समाजात असलेला अज्ञान, अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी, पंरपरा यावर भजनांच्या माध्यमातून प्रहार करीत होते. त्यांच्या भजनांना अफाट गर्दी उसळत होती. ही गर्दी शेवटपर्यंत कायम राहत होती. श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य राष्टÑसंतांच्या भजनामध्ये होते.
कुरखेडा तालुक्यात कार्यक्रमासाठी आल्यानंतर आंधळी येथील खुणे पाटील यांच्याकडे मुक्कामाला राहत होते. गुरूदेव भक्त एकनाथ कुंभारे यांच्याकडे सुद्धा राष्टÑसंतांनी मुक्काम केला होता. तुकडोजी महाराज वैरागड येथे हत्तीवर बसून आले. त्यांनी भंडारेश्वर मंदिराला भेट दिली. वैरागडजवळील कोसबी गावालाही गेले, अशी माहिती दिली.