उघड्यावर धान खरेदी केल्यास संस्थांना जबाबदार धरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:27 AM2021-05-28T04:27:09+5:302021-05-28T04:27:09+5:30

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांकडून खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईचा तिढा सुटल्याने रबीतील खरेदीचा ...

Institutions will be held responsible if paddy is purchased in the open | उघड्यावर धान खरेदी केल्यास संस्थांना जबाबदार धरणार

उघड्यावर धान खरेदी केल्यास संस्थांना जबाबदार धरणार

Next

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांकडून खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईचा तिढा सुटल्याने रबीतील खरेदीचा मार्ग सुकर झाला आहे; परंतु अजूनपर्यंत खरिपातील धानाची उचल झाली नाही. आरमोरी तालुक्यातील देलनवाडी, वडेगाव, दवंडी, वैरागड आदी केंद्रांवर मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विविध कार्यकारी संस्थानी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. गोदाम पूर्ण भरल्याने काही माल उघड्यावर आहे. हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. या वर्षात महामंडळाने ताडपत्रीदेखील पुरविली नाही. अशा स्थितीत खरेदी कशी करायची, असा प्रश्न संपूर्ण संस्थांसमोर निर्माण झाला आहे.

रबी हंगामातील धान खरेदीसंदर्भात काही निवडक संस्थांना पत्र आल्यानंतर काही दिवसांतच उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी संस्थांना पत्र दिल्याने संस्थांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावेळेस काही निवडक संस्थांमध्ये रबीची खरेदी होणार असून शेतकऱ्यांना विक्रीसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

बाॅक्स

शेतकरी माल विकणार कुठे?

काही दिवसांतच पावसाळ्याला सुरुवात हाेणार आहे. अधीच शेतकऱ्यांकडे रबी हंगामातील धान साठवून ठेवण्यासाठी जागा नाही. त्यामुळे रबीतील धान विक्री करणे आवश्यक आहे. सध्या खासगी व्यापारी कवडीमाेल भावाने धानाची खरेदी करीत आहेत; परंतु यात शेतकऱ्यांना बराच ताेटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सध्या शेतकरी धान विक्रीची लगबग करीत आहेत. यासाठी वारंवार ते खरेदी केंद्रावर हेलपाटे मारत असून शासनाने खरेदी केंद्र सुरू न केल्यास माल विकणार कुठे? असा प्रश्नही उपस्थित करीत आहेत.

===Photopath===

270521\27gad_3_27052021_30.jpg

===Caption===

उचल न झाल्याने कुरंडी खरेदी केंद्रावर खरिपातील धान अशाप्रकारे पडून आहे.

Web Title: Institutions will be held responsible if paddy is purchased in the open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.