हमीपत्रावर वेतन देयक पारित करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:51+5:302021-05-28T04:26:51+5:30
निवेदनात म्हटले आहे की, ऑनलाईन प्रक्रियेत अनुदान मंजूर झाले असताना शाईच्या प्रतीशिवाय कोषागार कार्यालय एप्रिल २०२१ चे देयक मंजूर ...
निवेदनात म्हटले आहे की, ऑनलाईन प्रक्रियेत अनुदान मंजूर झाले असताना शाईच्या प्रतीशिवाय कोषागार कार्यालय एप्रिल २०२१ चे देयक मंजूर करत नसल्यामुळे नागपूर विभागातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे-एप्रिल महिन्याचे वेतन रखडले आहे. ऑनलाईन वेतन प्रक्रियेत वेतन अधीक्षकांकडून बी.डी.एस.काढून तसेच अधीक्षकांकडून हमीपत्र देऊनही शाईची प्रत प्राप्त झाल्याशिवाय देयक मंजूर होणार नसल्याची माहिती संघटनेस प्राप्त झाली आहे. शाईच्या प्रतीचा आग्रह धरणे चुकीचा असून नागपूर विभागातील सर्व जिल्हा कोषागार यांना देयके मंजूर करण्यासंदर्भात निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली, तसेच वेतन पथक अधीक्षक यांनी दिलेल्या हमीपत्रावर वेतन देयक पारित करण्याच्या सुधारित सूचना देण्यात याव्यात, अन्यथा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नागपूर विभागात सर्व तालुकास्तरावर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. या निवेदनावर खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रमोद रेवतकर, कार्याध्यक्ष रहमतुल्लाह खान, सचिव विजय नंदनवार, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ, विभागीय कार्याध्यक्ष संजय बोरगावकर, विभागीय सचिव मोहन सोमकुवर यांच्या सह्या आहेत.