झुडपांमुळे प्रेतांसाठी जागा अपुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 05:00 AM2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:00:37+5:30
आरमोरी-रामाळा मार्गालगत नदीच्या पुलाजवळ स्मशानभूमीची एकमेव जागा आहे. येथे अनेक जातीधर्माचे लोक मृतांवर अंत्यसंस्कार पार पाडतात. सध्या या ठिकाणी कचºयाचे ढीग असून झाडेझुडपे वाढल्याने जंगलाचे रूप प्राप्त झाले आहे. अंत्यविधीत सहभागी होणाºया नागरिकांना पावसाळ्यात दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.
महेंद्र रामटेके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : गेल्या अनेक वर्षांपासून गरिबांची प्रेते आपल्या पोटात घेऊन त्यांना चीरविश्रांती देणारी आरमोरीची स्मशानभूमी अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या स्मशानभूमीला दाट झाडाझुडपांचा वेढा असल्याने तिचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. मात्र स्थानिक नगर परिषदेने येथे सोयीसुविधा उपलब्ध करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सध्या स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात आले. प्रेत पुरण्यासाठीही येथे जागा मिळणे कठिण झाले आहे.
आरमोरी-रामाळा मार्गालगत नदीच्या पुलाजवळ स्मशानभूमीची एकमेव जागा आहे. येथे अनेक जातीधर्माचे लोक मृतांवर अंत्यसंस्कार पार पाडतात. सध्या या ठिकाणी कचºयाचे ढीग असून झाडेझुडपे वाढल्याने जंगलाचे रूप प्राप्त झाले आहे. अंत्यविधीत सहभागी होणाºया नागरिकांना पावसाळ्यात दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. सध्या येथे उठबस करण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. विशेष म्हणजे, स्मशानभूमीचा विकास करण्यासाठी प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु काहीच उपयोग झाला नाही. अनेक वर्षांपासून असलेले कचºयाचे ढीग अद्यापही उचलण्यात आले नाही. रस्त्याने वीज खांब गाडले आहेत. परंतु दिव्यांची व्यवस्था नाही. सायंकाळच्या सुमारास अंत्यविधीसाठी जाणाºया नागरिकांना जोखीम पत्करून येथे यावे लागते. बसण्यासाठी येथे शेड व ओटे नाहीत. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. जागेची सफाईसुद्धा केली जात नाही. उन्हाळ्यात लखलखत्या उन्हाचे चटके तर पावसाळ्यात दुर्गंधी, साप, विंचू आदी विषारी प्राण्यांचा धोका पत्करावा लागतो. पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी जाणे म्हणजे, जोखीम पत्करण्यासारखे आहे. मात्र प्रशासन आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध न करता दुय्यम दर्जाची कामे करीत आहे. अनेक वर्षांपासून कायम दुर्लक्षित राहिलेल्या स्मशानभूमीचे अस्तित्त्व कायम राहण्यासाठी येथील झुडपी जंगल तोडावे तसेच कचरा व ढीगाºयांची विल्हेवाट लावावी. तेव्हाच स्मशानभूमीचे रूप पालटणार, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
वैैशिष्ट्यपूर्ण योजनेतून स्मशानभूमीच्या विकासासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर कामाला सुरूवात करण्यात येईल.
- पवन नारनवरे, नगराध्यक्ष, आरमोरी.
स्मशानभूमीत सोयीसुविधा निर्माण व्हाव्या, यासाठी अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र निवेदनाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी स्मशानभूमीची दुरवस्था झाली. प्रशासनाने लक्ष देऊन सुविधा उपलब्ध न केल्यास आंदोलन उभारण्यात येईल.
- हंसराज बडोले, जिल्हाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ.