कौटुंबिक ताटातूट टाळण्यासाठी अनेकांचा आंतरजिल्हा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:45 AM2021-06-09T04:45:25+5:302021-06-09T04:45:25+5:30
बहुतांश अर्ज योग्य कारणासाठी होते. पण काही अर्ज अनावश्यक असल्याने तर काही कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी नामंजूर करण्यात आले. यावेळी कोरोनाची ...
बहुतांश अर्ज योग्य कारणासाठी होते. पण काही अर्ज अनावश्यक असल्याने तर काही कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी नामंजूर करण्यात आले. यावेळी कोरोनाची दहशत जास्त असल्यामुळे योग्य कारणासाठीच बाहेर जाण्याची हिंमत लोक करत असल्याचे दिसून आले.
(बॉक्स)
अशी दिली जात होती पाससाठी कारणे
- जवळच्या नातेवाइकाचा मृत्यू झाला. त्यामुळे भेटण्यासाठी जायचे आहे.
- जवळच्या नातेवाइकांचे किंवा परिवारातील लग्न आहे. त्यासाठी जायचे आहे.
- वैद्यकीय उपचार घेण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील रुग्णालयात जायचे आहे.
- दुसऱ्या जिल्ह्यात असलेले आई किंवा वडील पॉझिटिव्ह आहे, त्यापैकी निगेटिव्ह असणाऱ्यांना सांभाळायला जायचे आहे.
- मुलगा किंवा मुलगी दुसऱ्या जिल्ह्यात अडकून पडले आहे. त्यांना आणायला जायचे आहे.
अनेकांनी ‘मारले’ नातेवाइकांना
- आंतरजिल्हा प्रवासासाठी खरे कारण सांगितले तर कोणी पास मंजूर होणार नाही म्हणून अनेकजण नातेवाइकांचा मृत्यू झाल्याचे खोटे कारण टाकत होते. पण प्रवासाची तारीख मात्र चार दिवसांनंतरची राहात होती. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास लगेच किंवा दुसऱ्या दिवशी जाण्याची परवानगी कोणीही मागेल; पण चार दिवसानंतरची तारीख असल्याने शंका घेण्यास वाव राहात होता. पडताळणीत अशी अनेक कारणे खोटी असल्याचे आढळल्याने त्यांना पास मिळाले नाहीत.
(कोट)
यावेळी योग्य कारणांसाठी ई-पास घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त होते. आम्ही क्रॉस चेक करून दिलेले कारण आणि कागदपत्रांची पडताळणी करूनच पास मंजूर करत होतो. जिल्ह्यात आरोग्य सुविधा चांगल्या असल्याने अनेकांना उपचारासाठी बाहेर जाण्याची गरज पडली नाही.
- विश्वास जाधव
पोलीस निरीक्षक, विशेष शाखा