छल्लेवाडा येथे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:47 AM2021-02-25T04:47:36+5:302021-02-25T04:47:36+5:30

आलापल्ली : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा येथे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यात आला. मातृभाषेचा प्रचार व प्रसारास ...

International Mother Language Day at Chhallewada | छल्लेवाडा येथे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

छल्लेवाडा येथे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

Next

आलापल्ली : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा येथे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यात आला. मातृभाषेचा प्रचार व प्रसारास चालना मिळावी या उद्देशाने शाळेत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भारतीय संविधान प्रस्तावनेचे मातृभाषेतून आदर्श वाचन, निबंध स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा व मराठी गोष्टींचा शनिवार आदी स्पर्धा घेण्यात आल्या. प्रस्तावना वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक नितीन विलास भसारकर, द्वितीय रक्षा वसंत गुरनुले, निबंध स्पर्धेत विक्रम सुरेश ठाकरे याने प्रथम क्रमांक, सामान्य ज्ञान स्पर्धेत आदित्य सत्यम गुरनुले याने प्रथम व स्वाती दसरू लावडे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. समूह गीत स्पर्धेत इयत्ता ८ वीच्या विद्यार्थिनींच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला. याप्रसंगी विषयतज्ज्ञ सुषमा खराबे, ज्ञानेश्वर कापगते, मुख्याध्यापक सामा सिडाम यांनी मार्गदर्शन केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी कल्पना रागिवार, समय्या चौधरी, मुसली जुमडे, बाबूराव कोडापे, राजेंद्र दहिफळे उपस्थित होते. संचालन सूरजलाल येलमुले तर आभार राजेंद्र दहिफळे यांनी मानले.

Web Title: International Mother Language Day at Chhallewada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.