१४९ ग्रा.पं.त इंटरनेट सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 11:56 PM2018-10-04T23:56:25+5:302018-10-04T23:56:59+5:30

प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी शासन आॅनलाईन कामे करण्यावर भर देत आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडल्या जात आहे. जिल्ह्यातील ४५५ ग्रामपंचायतींपैकी सुमारे १४९ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत.

Internet service in 14 9 p.m. | १४९ ग्रा.पं.त इंटरनेट सेवा

१४९ ग्रा.पं.त इंटरनेट सेवा

Next
ठळक मुद्देप्रशासनात गतिमानता आणण्याचा प्रयत्न : पहिल्या टप्प्यात २३८ ग्रा.पं.मध्ये काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी शासन आॅनलाईन कामे करण्यावर भर देत आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडल्या जात आहे. जिल्ह्यातील ४५५ ग्रामपंचायतींपैकी सुमारे १४९ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत.
केंद्र शासन ग्रामसभांना विशेष महत्त्व देत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती या मध्यस्थी स्वयंसेवी संस्थांना टाळून सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यात निधी जमा करण्याचे धोरण अवलंबिले आहे. या निधीच्या वापराबरोबरच ग्रामपंचायतीच्या कारभारात गतिमानता आणण्यासाठी ग्रामपंचायत सर्वप्रथम इंटरनेट कनेक्टिव्हीटीने जोडता येणे आवश्यक आहे. गावापर्यंत केबल गेल्यास गावातील इतर संस्था व नागरिकांनाही इंटरनेटची सुविधा उपलब्ध होईल. याच उद्देशाने देशातील प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेट कनेक्टिव्हीटीने जोडण्याचे धोरण केंद्र शासनाने अवलवंबिले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४५५ ग्रामपंचायती आहेत. पहिल्या टप्प्यात आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, गडचिरोली, कुरखेडा, मुलचेरा या तालुक्यातील ग्रामपंचायती जोडल्या जाणार आहेत. इंटरनेट कनेक्टिव्हीटी देण्यासाठी आॅप्टिकल फायबर केबल टाकण्याच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. सद्य:स्थितीत १४९ ग्रामपंचायतीमध्ये केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. बहुतांश ग्रामपंचायतींनी इंटरनेटसेवेने जोडल्या गेल्या आहेत. ८९ ग्रामपंचायतीपर्यंत केबल टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील ज्या तालुक्याची निवड केली आहे, या तालुक्यांमध्ये नक्षल चळवळीचा प्रभाव नाही. मात्र दुसऱ्या टप्प्यातील सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, कोरची, धानोरा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. तसेच नक्षलचळवळ सुद्धा कार्यरत आहे. अशा परिस्थितीत केबल टाकण्यात फार मोठ्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांपर्यंत मोबाईल टॉवर पोहोचले नाही. त्यामुळे तेथील नागरिक, युवक इंटरनेट व मोबाईल सेवेपासून वंचित आहेत. शासकीय कार्यालयांचे कारभार आॅनलाईन झाले आहेत. मात्र गावात इंटरनेट नसल्याने हे व्यवहार करण्यास अडचण निर्माण होत होती. गावात इंटरनेट सेवा पोहोचल्यानंतर ग्रामपंचायतीबरोबरच शिक्षक, तलाठी, आरोग्यसेवकांना इंटरनेटची सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याने त्यांचेही काम सोपे होणार आहे.
गावातही मिळणार इंटरनेट सेवा
ओएफसी केबल हे दूरसंचार क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. पारंपरिक ब्रॉडबँडच्या तुलनेत ओएफसी केबलमुळे इंटरनेटची क्षमता २० ते २५ पटीने वाढते. गावापर्यंत पोहोचलेल्या ओएफसी केबलला जोडून गावातील इतर नागरिकांनाही इंटरनेट कनेक्टिव्हिटी घेता येणार आहे. दिवसेंदिवस आॅनलाईन व्यवहारांचे महत्त्व वाढत चालले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकही इंटरनेट सेवा घेण्यास इच्छुक आहेत. ज्या गावांमध्ये बँक, शाळा, महाविद्यालये आहेत, त्या गावांसाठी इंटरनेटसेवा महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे गावाचा विकास होण्यास मदत होणार आहे. शासकीय कार्यालये सुद्धा स्मार्ट होण्यास मदत होईल.

Web Title: Internet service in 14 9 p.m.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.