देलनवाडी परिसरात इंटरनेटसेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:26+5:302021-02-14T04:34:26+5:30

मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्याच्या देलनवाडीसह परिसरात मागील काही दिवसांपासून बीएसएनएल मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ...

Internet service disrupted in Delanwadi area | देलनवाडी परिसरात इंटरनेटसेवा विस्कळीत

देलनवाडी परिसरात इंटरनेटसेवा विस्कळीत

Next

मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्याच्या देलनवाडीसह परिसरात मागील काही दिवसांपासून बीएसएनएल मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ऑनलाईन कामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

देलनवाडी येथे बीएसएनएलचे टॉवर आहे. परंतु इंटरनेट स्पीड अत्यंत कमी आहे. मोबाईल, संगणक अथवा लॅपटॉपवर काम करणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, मानापूर येथे सहकारी बँक शाखा, बँक ऑफ इंडियाचे विस्तार वक्रांगी केंद्र, विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, देलनवाडी येथे तलाठी कार्यालय, वन विभाग कार्यालय, सेतू केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी संगणक केंद्र आहेत. त्यामुळे दररोज येथून ऑनलाईन कामे केली जातात. मात्र काही दिवसांपासून मोबाईल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. लॉकडाऊनमुळे अनेकजण ऑनलाईन मिटिंग घेत आहेत. मात्र, कव्हरेज विस्कळीत होत असल्याने त्यांनाही प्रचंड त्रास होत आहे. परिसरात खासगी कंपन्यांची फोर-जी सेवा उपलब्ध आहे. परंतु बीएसएनएल अद्यापही फोर-जी सेवा उपलब्ध केली नाही. या भागात थ्री- जी सेवा दिली जात असली तरी टू- जी सेवेसारखी स्पीड मिळत असल्याने ग्राहक नाराज आहे.

Web Title: Internet service disrupted in Delanwadi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.