वर्षाकाठी १०० वर आंतरजातीय विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:06 AM2018-03-14T01:06:01+5:302018-03-14T01:06:01+5:30

विज्ञान, तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे शिक्षण व नोकऱ्यांच्या माध्यमातून शेकडो युवक, युवती एकत्र येत आहे.

Interracial marriages at 100 | वर्षाकाठी १०० वर आंतरजातीय विवाह

वर्षाकाठी १०० वर आंतरजातीय विवाह

Next
ठळक मुद्देजनजागृतीची गरज : पाच वर्षात ५६३ जोडपी विवाहबद्ध

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : विज्ञान, तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे शिक्षण व नोकऱ्यांच्या माध्यमातून शेकडो युवक, युवती एकत्र येत आहे. परिणामी आधुनिक विचारसरणीतून गडचिरोली जिल्ह्यात आंतरजातीय विवाहाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गडचिरोली जिल्ह्यात वर्षाकाठी सरासरी १०० वर आंतरजातीय विवाह होत असल्याचे जि.प.च्या समाज कल्याण विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
सन २०१३-१४ ते २०१७-१८ या पाच वर्षाच्या कालावधीत आतापर्यंत जिल्ह्याच्या बाराही तालुक्याच्या एकूण ५६३ जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे. सन २०१३-१४ मध्ये ११२, सन २०१४-१५ मध्ये १८४, २०१५-१६ मध्ये ५९, २०१६-१७ मध्ये १०० तर २०१७-१८ मध्ये आतापर्यंत १०८ जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे. यातील बहुतांश जोडप्यांनी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात रितसर अर्ज सादर करून शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतला.
केंद्र व राज्य शासनाकडून मिळून आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना एकूण ५० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. ५६३ जोडप्यांना आतापर्यंत एकूण २ कोटी ८१ लाख ५० हजार रूपये जि.प. समाज कल्याण विभागाच्या वतीने अनुदान स्वरूपात वितरित करण्यात आले आहे. जातीय भेदाभेद कमी करून जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी शासनाच्या या योजनेचा फायदा होत आहे. एकूणच आंतरजातीय विवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे.
तंटामुक्त समित्यांच्या पुढाकाराने प्रमाण वाढले
गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटविण्यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची स्थापना केली. मात्र गेल्या चार-पाच वर्षापासून जिल्हाभरातील तंटामुक्त गाव समित्या आंतरजातीय विवाह लावून देऊन संबंधित जोडप्यांना मोठा आधार देत आहेत. समित्यांनी आजवर ५०० वर जोडप्यांचे आंतरजातीय विवाह लावून दिले आहेत. उपवर वधूंकडून प्राप्त प्रस्तावांवर चर्चा करून तंमुसचे पदाधिकारी हे कार्य पार पाडत आहेत.

Web Title: Interracial marriages at 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.