विद्यार्थ्यांना शस्त्रांचा परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:36 AM2021-01-03T04:36:13+5:302021-01-03T04:36:13+5:30
अहेरी : पाेलीस दिनाचे औचित्य साधून पाेलीस स्टेशन अहेरीच्या वतीने धर्मराव कृषी विद्यालय अहेरी येथील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना ...
अहेरी : पाेलीस दिनाचे औचित्य साधून पाेलीस स्टेशन अहेरीच्या वतीने धर्मराव कृषी विद्यालय अहेरी येथील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शस्त्रांचा परिचय करून देण्यात आला. फायर गण, एसएलआर रायफल, ग्लाॅक पिस्टल, ९ एमएम पिस्टल, एके ४७, एलएमजी या शस्त्रांचे विविध पार्ट, वजन, रेंज, राऊंड, मॅग्जिन या विषयी पीएसआय दिनेश गावंडे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. एएसआय बाळासाहेब शिंदे यांनी पाेलीस स्टेशनचा कारभार कसा चालता, पाेलीस स्टेशनचे विविध विभाग तसेच शस्त्रांविषयीची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार प्रवीण डांगे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून पीएसआय आरती नराेटे, रूपाली काळे, आसावरी शेडगे, धर्मराव कृषी विद्यालय अहेरीचे शिक्षक प्रवीण बुरान, मुकेश गाेंगले, सुरेश पाेहणे, हेमंत बाेरकर आदी उपस्थित हाेते.
फाेटाे : शस्त्रांची माहिती देताना पाेलीस निरीक्षक प्रवीण डांगे.