आरमोरी मेळाव्यात ५० वधू-वरांनी दिला परिचय
By admin | Published: December 28, 2016 03:07 AM2016-12-28T03:07:27+5:302016-12-28T03:07:27+5:30
बावणी कुणबी समाज बहुउद्देशिय विकास मंडळ आरमोरीच्या वतीने २५ डिसेंबर रोजी मेळावा घेण्यात आला.
बावणे कुणबी समाज : आरक्षण मुद्यावरही मेळाव्यात झाली चर्चा
आरमोरी : बावणी कुणबी समाज बहुउद्देशिय विकास मंडळ आरमोरीच्या वतीने २५ डिसेंबर रोजी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ५० वधू-वरांनी परिचय दिला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बावणे कुणबी समाज कुहीचे अध्यक्ष के. एम. तितीरमारे होते. यावेळी उद्घाटन नागपूरचे के. टी. मत्ते यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय सदस्य हरीश मने, मीना बाडेबुचे, डॉ. रेहपाडे, शिवशंकर कायते, प्रभाकर सेलोकर, देसाईगंज पं. स. सदस्य शांताबाई तितीरमारे, हरी मोटघरे, सुनील कुकडे, पोटफोडे, होमदेव ठवकर, अमृतराव तुमसरे, भास्कर ठवकर आदी उपस्थित होते.
सुरुवातीला जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्ज्वलाने मेळाव्याची सुरुवात झाली. यावेळी कुणबी समाजाची वर्तमान व भविष्यकालीन दिशा, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व औद्योगिक विकास तसेच एक कुणबी लाख कुणबी व आरक्षण आदी बाबीवर मेळाव्यात चिंतन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थी अनुयश गोंदोले, विशाखा बोरकर, शुभांगी भोयर, वैष्णवी टीचकुले, तिलोतमा बाते, मनीषा शेंडे, पायल सपाटे, दीशा तिजारे यांचा सत्कार करण्यात आला.
कुणबी समाजाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ब्लॉगवर माहिती यावेळी देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे संचालन दिलीप गोंदोळे, अध्यक्ष बंडूजी डोकरे व आभार संतोष मने यांनी मानले. या मेळाव्याच्या आयोजनासाठी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी मने, शालू सेलोकर, सुभाष सपाटे, कवडू सेलोकर, अंकुश गाढवे, दिमराव तिजारे, गुलाब मने, विलास गोदोळे, मनोज मने, भाऊराव बोरकर, वामन सेलोकर, राजू सारवे, नंदू मने, कल्पना तिजारे, तेजराव बोरकर, सुरेश बोरकर, शंकर बोरकर, नितीन ठवकर व समस्त सल्लागार मंडळाने सहकार्य केले. या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आदी भागातूनही समाजबांधव एकत्र आले होते. (तालुका प्रतिनिधी)