सभेच्या प्रोसेडिंगची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2017 02:17 AM2017-05-01T02:17:48+5:302017-05-01T02:17:48+5:30

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत दोटकुली ग्रामपंचायतीच्या सन २०१३-१४ मध्ये झालेल्या मासिक सभेच्या ग्राम निधीच्या जमा खर्चाची पडताळणी केली...

Investigate the process of the meeting | सभेच्या प्रोसेडिंगची चौकशी करा

सभेच्या प्रोसेडिंगची चौकशी करा

Next

सतीश पुटकमवार यांची मागणी : दोटकुलीच्या ग्रामनिधीत अफरातफर झाल्याचा आरोप
चामोर्शी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत दोटकुली ग्रामपंचायतीच्या सन २०१३-१४ मध्ये झालेल्या मासिक सभेच्या ग्राम निधीच्या जमा खर्चाची पडताळणी केली असता, हजारो रूपयांची अफरातफर झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे तत्कालीन प्रोसिडींग रजिस्टरची सर्वकष चौकशी करून त्याची वसुली करून द्यावी तसचे संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य सतीश मधुकर पुटकमवार यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
बीडीओंना दिलेल्या निवेदनात पुटकमवार यांनी म्हटले आहे की, ३० आॅगस्ट २०१३ रोजी घेण्यात आलेल्या दोटकुली ग्रा.पं.च्या मासिक सभेत अखेरची शिल्लक ६२ हजार ४३७ रूपये आढळून आली. परंतु २९ सप्टेंबर २०१३ च्या मासिक सभेत ग्राम निधीत जमा रकमेमध्ये सुरूवातीची शिल्लक ५७ हजार ५०० रूपये दाखविली असल्याने ग्राम निधी जमा खर्चात ४ हजार ९३७ रूपयांची अफरातफर झाल्याचे स्पष्ट होते. तसेच २७ सप्टेंबर २०१३ च्या मासिक सभेत पाणी पुरवठा फंडाची अखेरची शिल्लक ११ हजार ६०२ रूपये दाखविले असून जमा खर्च निरंक आहे. मात्र २४ डिसेंबर २०१३ च्या मासिक सभेत पाणी पुरवठा फंडाची सुरूवातीची शिल्लक ६ हजार ७८६ रूपये दाखविली असल्याने ‘त्या’ रकमेत ४ हजार ८१२ रूपयांची अफरातफर आढळून आली आहे. सदर अफरातफर तत्कालीन सरपंच साईनाथ गंगाराम चुधरी व सचिव पी. जी. परचाके यांनी संगणमत करून केली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आर्थिक फंडात या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधिताकडून अफरातफरीच्या रक्कमेची वसुली करावी, अशी मागणी पुटकमवार यांनी केली आहे. २९ जानेवारी २०१४ च्या मासिक सभेचे अध्यक्ष साईनाथ गंगाराम चुधरी असल्याचे नमूद आहे. परंतु त्यांची स्वाक्षरी नाही. त्या प्रोसिडींगवर केवळ तीन सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने त्या तीन सदस्यांच्या उपस्थित सभा घेऊन सर्व विषय मंजूर करण्यात आल्याचा आरोप होत आहे. अशा अनेक मासिक सभेत केवळ तीन सदस्यांची उपस्थिती दर्शविण्यात आली आहे. ८ फेब्रुवारी २०१४ ची मासिक सभा न घेता प्रोसिडींग रजिस्टरमध्ये चार पाने कोरे ठेवून ३० सप्टेंबर २०१४ ची मासिक सभा घेण्यात आली. त्याचप्रमाणे २७ नोव्हेंबर २०१४, डिसेंबर २०१४, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०१५ च्या मासिक सभा न घेताच २७ पाने कोरे ठेवण्यात आली. माजी सरपंच व माजी सदस्य त्या लाभार्थ्याबद्दल आक्षेप घेऊन सदर कामात गाव विकासात अडथळे आणत आहे. त्यांच्या कार्यकाळातील प्रोसिडींगची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पुटकमवार यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

शौचालय बांधकामास प्रारंभ नसतानाही पूर्णत्वाचे प्रमाणपत्र
आनंदराव गंगाराम चुधरी हा माजी सरपंचाचा भाऊ असून त्यांना घरकूल बांधकामाकरिता पं.स. चामोर्शीकडून ५० हजार रूपयांचा धनादेश मिळालेला होता. परंतु २०११-१२ पासून अद्यापही बांधकाम सुरू केले नाही. मात्र बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सचिव व सरपंचांनी दिले. २९ आॅगस्ट २०१४ च्या विशेष तहकूब ग्रामसभेत लक्ष्मीबाई लटारू आभारे व काशुबाई केशव पाल यांची शौचालय बांधकामासाठी निवड करण्यात आली. या सभेपूर्वीच लक्ष्मीबाई आभारे बेपत्ता व केशवबाई पाल मयत झाली होती. तरीही तत्कालीन सरपंच साईनाथ गंगाराम चुधरी व ग्रा.पं. सदस्य राजेश्वर तुकाराम चुधरी यांनीही सहमती दर्शविली होती. या दोन्ही लाभार्थ्यांना सन २०१६-१७ वर्षात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय मंजूर झाले आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर धनादेश देण्यात आला आहे. लाभार्थी बेपत्ता व मयत असल्याने ग्रामसभेने ठरवून दिलेल्या व्यक्तींना धनादेश वितरित केले, असेही ग्रा.पं.सदस्य सतीश पुटकमवार यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

Web Title: Investigate the process of the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.