मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करा
By Admin | Published: August 3, 2015 01:10 AM2015-08-03T01:10:20+5:302015-08-03T01:10:20+5:30
नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांची त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी यशवंत नाकतोडे यांनी केली आहे.
गैरकारभार : यशवंत नाकतोडे यांची मागणी
देसाईगंज : नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांची त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी यशवंत नाकतोडे यांनी केली आहे.
मुख्याधिकारी विनोद जाधव यांची उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाणे यांच्या मार्फतीने चौकशी करण्यात आली होती. या चौकशी अहवालात विनोद जाधव हे दोषी असल्याचे आढळून आले आहे. तशा प्रकारचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनाच तक्रारकर्ता बनवून एका शेतकऱ्याला दोषी ठरवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व मुख्याधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या मार्फतीने केला आहे. रस्ता दुभाजकाच्या करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग करून कंत्राटदारास देण्यात आलेल्या अग्रीम रक्कमेच्या प्रकरणातही जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीने त्यांना दोषी ठरविले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी नाकतोडे यांनी केली आहे.