क्रीडा पुरस्कारासाठी मागविले अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:29 AM2021-01-02T04:29:48+5:302021-01-02T04:29:48+5:30
क्रीडापटू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी १० जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. पुरस्काराकरिता खेळाडूंनी ...
क्रीडापटू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी १० जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. पुरस्काराकरिता खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय, वरिष्ठ व कनिष्ठ, अजिंक्य पद स्पर्धेत तसेच शालेय, ग्रामीण व महिला स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली असावी. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असले पाहिजे. क्रीडा मार्गदर्शकांनी गडचिरोली जिल्ह्यातील गत दहा वर्षात मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारातील वरिष्ठ, कनिष्ठ गटाच्या अधिकृत राज्य व राष्ट्रीय स्पर्धा तसेच शालेय, ग्रामीण व महिला राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तयार केलेले असावेत. अर्ज करतेवेळी वय ३५ वर्षे पूर्ण असावे. पुरस्काराकरिता १ जुलै ते ३० जून या कालावधीतील कामगिरी विचारात घेतली जाईल. अश्वाराेहण, ॲथलेटिक्स, कॅरम, कुस्ती, गोल्फ, जलतरण, तलवारबाजी, तायक्वाँडो, जिम्नॅस्टिक, ज्युदो, धनुर्विद्या, नेमबाजी, टेनिस, टेबल - टेनिस, ट्रायथलॉन, पाॅवरलिफ्टिंग, बुद्धिबळ, बॅडमिंटन, मुष्टीयुद्ध, वेटलिफ्टिंग, मल्लखांब, वुशू, शरीरसौष्ठव, सायकलिंग, बिलीयर्ड ॲन्ड स्नुकर, स्केटिंग, स्वॅश, आट्यापाट्या, कबड्डी, खो-खो, कयाकिंग / कॅनोईंग, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, याटिंग, रोईंग, हँडबॉल, हॉकी, व्हॉलिबॉल, साॅफ्टबॉल, रग्बी, मॉडर्न पेंटाथलॉन, बेसबॉल व स्पोर्ट्स क्लायंबिंग याच खेळातील कामगिरी विचारात घेतली जाईल. इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठाेड यांनी केले आहे.