सुरक्षेसाठी चंद्रपूर मार्गावर लोखंडी पोलची उभारणी

By admin | Published: September 26, 2016 01:33 AM2016-09-26T01:33:49+5:302016-09-26T01:33:49+5:30

गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीवर मोठा पूल आहे. या पुलापूर्वी वळण असून येथे आजवर अनेक अपघात घडले आहेत.

Iron polar construction on the Chandrapur road for safety | सुरक्षेसाठी चंद्रपूर मार्गावर लोखंडी पोलची उभारणी

सुरक्षेसाठी चंद्रपूर मार्गावर लोखंडी पोलची उभारणी

Next

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे काम सुरू : वैनगंगा नदी पुलाच्या वळणावर खबरदारी
गडचिरोली : गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीवर मोठा पूल आहे. या पुलापूर्वी वळण असून येथे आजवर अनेक अपघात घडले आहेत. या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोलीच्या वतीने सदर वळण परिसरात रस्त्याच्या कडेला सिमेंट काँक्रीटने लोखंडी पोल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. अपघातातील वाहन रस्त्याच्या खाली उतरू नये, याची खबरदारी म्हणून सदर काम हाती घेण्यात आले आहे.
रात्रीच्या सुमारास वाहनधारकांना वैनगंगा नदी पुलाजवळ असलेले वळण स्पष्ट दिसत नाही. परिणामी अपघात होऊन वाहन रस्त्याच्या खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारचे अपघात या ठिकाणी होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चंद्रपूर मार्गावर पुलाच्या पूर्वी वळणावर सिमेंट काँक्रीटने लोखंडी पोल उभारण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू केले आहे. सदर वळणावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दिशा व सूचनेचा फलक लावण्यात येणार आहे. सदर कामावर अनेक मजूर कार्यरत आहेत. या मार्गावर सध्या वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम सुरू केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

अनेक वळणे धोक्याची
आरमोरी, चामोर्शी, धानोरा या प्रमुख मार्गासह इतर वर्दळीच्या मार्गावर अनेक
धोक्याची वळणे आहेत. या वळणावरही आजवर अनेक अपघात घडले असून कित्येकांचा बळी गेला आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील वर्दळीच्या सर्वच मार्गावरील वळणावर सिमेंट काँक्रीटने लोखंडी खांब उभारण्याची गरज आहे.

Web Title: Iron polar construction on the Chandrapur road for safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.