तुमच्या ‘डीपी’वरील फाेटाेचे माॅर्फिंग तर हाेत नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 05:00 AM2021-10-09T05:00:00+5:302021-10-09T05:00:30+5:30

सायबर माॅर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिलांची किंवा तरुणींची छायाचित्रे डाउनलोड करून अवमानना होईल, अशा प्रकाराने माॅर्फिंग करून ते पुन्हा वेबसाइटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्रोफाइल बनविले जातात. त्यामुळे तरुणी आणि महिलांनो डीपी ठेवताना सजग राहण्याची गरज आहे.

Isn't the morphing of Fate on your DP in hand? | तुमच्या ‘डीपी’वरील फाेटाेचे माॅर्फिंग तर हाेत नाही ना?

तुमच्या ‘डीपी’वरील फाेटाेचे माॅर्फिंग तर हाेत नाही ना?

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाला आपल्या आवडीचे फोटो, मते मांडण्याची, लोकांशी जोडण्याची संधी  मिळाली आहे. एकीकडे सोशल मीडियाचे स्वातंत्र्य अनुभवत असतानाच दुसरीकडे मात्र, महिलांना सावधगिरीने वागावे लागत आहे. महिला, मुलींनो तुमच्या डीपीवरील छायाचित्राचे मॉर्फिंग तर होत नाही ना, हे पाहण्याची गरज असून अधिक सावध राहण्याची गरज आहे. 
मनोरंजनाचे साधन म्हणून फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपचा वापर वाढल्याने सायबर गुन्हेगारांना आयतीच मेजवानी मिळत आहे. त्यातून मुली, महिलांच्या छायाचित्रांच्या मॉर्फिंगचे प्रकार घडू लागले आहेत. सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोचा गैरवापर करून त्रास देणे, बनावट अकाउंट काढून अश्लील पोस्ट टाकणे, इन्स्टाग्रामवरील फोटो चोरून मॉर्फ करत त्रास देणे, सोशल मीडियावर मोबाइल क्रमांक टाकणे, व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो पाठवून त्रास देणे, अशा प्रकारच्या त्रासाला महिलांना सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस हे प्रकार वाढत चालले असल्याने युवतींनी त्यापासून सावध असण्याची गरज आहे.

माॅर्फिंग म्हणजे काय?
सायबर माॅर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिलांची किंवा तरुणींची छायाचित्रे डाउनलोड करून अवमानना होईल, अशा प्रकाराने माॅर्फिंग करून ते पुन्हा वेबसाइटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्रोफाइल बनविले जातात. त्यामुळे तरुणी आणि महिलांनो डीपी ठेवताना सजग राहण्याची गरज आहे.

असा होईल गुन्हा दाखल
माॅर्फिंग म्हणजे मूळ चित्रामध्ये बेकायदेशीरपणे बदल करणे, बनावट खातेधारक महिलांची चित्रे डाउनलोड करून त्यामध्ये बदल करून ती दुसऱ्या वेबसाइटवर पुन्हा पोस्ट करतात. असे करणे हा आयटी ॲक्ट २००० अंतर्गत गुन्हा आहे. भादंविच्या कलमाखालीही गुन्हेगाराला अटक होऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये भादंविचे कलम ३५४, ३५४ ड व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ ड अन्वये गुन्हा दाखल केला जातो.

-    फेसबूकवरील छायाचित्रांना सर्वाधिक धाेका राहते. त्यामुळे फेसबूक वापरकर्त्याने स्वत:ची प्राेफाईल लाॅक करून ठेवावी, जेणे करून मित्रांव्यतिरिक्त इतर व्यक्ती आपले फाेटाे पाहू शकणार नाही.

 

Web Title: Isn't the morphing of Fate on your DP in hand?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.