मसेली आश्रमशाळेला आयएसओ दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:31 AM2021-02-08T04:31:59+5:302021-02-08T04:31:59+5:30
काेरची : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत येणाऱ्या मसेली शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला नुकताच आयएसओ दर्जा प्राप्त झाला. मागील शैक्षणिक ...
काेरची : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत येणाऱ्या मसेली शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला नुकताच आयएसओ दर्जा प्राप्त झाला. मागील शैक्षणिक सत्रापासून शालेय व्यवस्थापन व सोयीसुविधांबाबत वेळाेवेळी शाळेचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर शाळेला हा दर्जा बहाल करण्यात आला.
मसेली आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आर. एम. पत्रे यांच्यासह सर्व शिक्षक तथा कर्मचाऱ्यांनी शाळेत सुविधा उपलब्ध करणे व शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी वेळाेवेळी परिश्रम घेतले. याकरिता वेद असोसिएट संस्था नागपूर यांच्या वतीने अनेकदा मूल्यांकन करण्यात आले. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर यांचे मार्गदर्शन व सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे वेद असोसिएट नागपूर येथील निरीक्षक व पर्यवेक्षक विनोद कोल्हे, रोशन महल्ले व प्रजापती यांच्या हस्ते मुख्याध्यापक आर.एम. पत्रे यांना प्रमाणपत्र देऊन शाळेचा गाैरव करण्यात आला. यासाठी शिक्षक प्रभुदास लाडे, बी.एम. चौधरी, आशिष ढबाले, शिक्षिका विशाखा सोनवणे, वीणा जांभुळकर, उषा सोनकुसळे, भारती रहांगडाले, राजलक्ष्मी ढेकवार व अधीक्षक प्रमोद तुलावी यांच्यासह महेश यादव, अंगद कुमरे, एम. टी. मडावी, हरसिंग बोगा, देवचंद कोडाप व सुमन बांडे यांनी परिश्रम घेतले.