बजाविली नोटीस

By admin | Published: June 14, 2014 11:32 PM2014-06-14T23:32:40+5:302014-06-14T23:32:40+5:30

शहराला लागून गोकुलनगरचा मुख्य तलाव आहे. या तलावात शहरातील अनेक नागरिकांनी पक्के घर बांधून अतिक्रमण केले आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन या तलावातील अतिक्रमीत कुटुंबानांना धोका निर्माण होऊ नये

Issued notice | बजाविली नोटीस

बजाविली नोटीस

Next

सतर्कतेचा इशारा : तलावाच्या पात्रात अतिक्रमण केलेल्या २१ कुटंबाना
गडचिरोली : शहराला लागून गोकुलनगरचा मुख्य तलाव आहे. या तलावात शहरातील अनेक नागरिकांनी पक्के घर बांधून अतिक्रमण केले आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन या तलावातील अतिक्रमीत कुटुंबानांना धोका निर्माण होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. सतर्कतेचा इशारा देत पालिका प्रशासनाने तलावाच्या पात्रामध्ये अतिक्रमण केलेल्या २१ कुटुंबाना नोटीस बजाविली असून स्थलांतरीत होण्याचा तीन दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे.
ंजिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी मे महिन्यात कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनासंबंधी बैठक बोलाविली. या बैठकीत जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला . बाराही तालुक्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणाऱ्या आपत्तीपासून नागरिकांचे संरक्षण करण्याबाबत निर्देश दिले. पावसाळयात गोकुलनगरचा मुख्य तलाव पुर्णत: हाऊसफूल होतो. परिणामी सदर तलाव ओव्हरफ्लो होऊन तलावातील पाणी नजिकच्या घरांमध्ये शिरते. यामुळे अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान होते. वेळ प्रसंगी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. शहरातील नागरिकांना अतिवृष्टीचा तडाखा बसू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार नगर पालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे.
याचाच एक भाग म्हणून तलावाच्या पात्रातील अतिक्रमणधारक २१ कुटुंबांना इतरत्र स्थलांतरीत होण्याबाबत नोटीस बजाविली आहे. तलावाच्या पात्रामध्ये अतिक्रमण करून अनाधिकृतरित्या बांधकाम केले असल्याचेही पालिका प्रशासनाने दिलेल्या नोटीसमध्ये नमुद केले आहे. पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तलावाच्या पात्रातील घरांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवून या ठिकाणाहून इतरत्र स्थलांतरीत व्हावे, या निर्देशाचे नोटीस अतिक्रमीत कुटुंबाना देण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे प्रसंगी जीवितहानी होण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेऊन सतर्क व्हावे, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.
यामुळे नुकसान झाल्यास न.प. प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचाही स्पष्ट खुलासाही नोटीसमध्ये करण्यात आला आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन पाळीलगत असलेला बायपास मार्ग पूर्णत: बंद होतो. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Issued notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.