लोकसभेत काँग्रेसला बसलेला फटका भरून काढणे अशक्य

By admin | Published: June 14, 2014 11:33 PM2014-06-14T23:33:04+5:302014-06-14T23:33:04+5:30

लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला ७० हजार मतांचा फटका बसला आहे. आरमोरी, अहेरी विधानसभा क्षेत्रातही ४२-४३ हजाराचा फटका बसला आहे. काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत

It is impossible to get the Congress sitting in the Lok Sabha | लोकसभेत काँग्रेसला बसलेला फटका भरून काढणे अशक्य

लोकसभेत काँग्रेसला बसलेला फटका भरून काढणे अशक्य

Next

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला ७० हजार मतांचा फटका बसला आहे. आरमोरी, अहेरी विधानसभा क्षेत्रातही ४२-४३ हजाराचा फटका बसला आहे. काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत हे मताधिक्य भरून काढू शकत नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या जागा लढविल्यास लोकसभेत बसलेल्या फटक्यातून सावरण्याची ताकद राकाँत आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या सभागृहात पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण कमी झाले आहे. ओबीसींच्या प्रश्नावर राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले. याचा फटका विदर्भात काँग्रेस-राकाँ आघाडीला बसला. जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करावे, अशी मागणी आपण राकाँचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच शासनाने विधानसभेत घोषणा केल्यानंतरही आदिवासी विकास महामंडळाचे खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. ते सुरू करण्यात यावे, व्यापारीच मालाची खरेदी करीत आहे, असे ते म्हणाले. मोदी लाटेमुळे निवडणुकीत देशभरात संपुआचा पराभव झाला असला तरी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात विविध कारणामुळे आम्ही मतदारांपर्यंत पोहोचू शकलो नाही. काँगे्रसला या निवडणुकीत जबर फटका या मतदार संघात बसला. विधानसभेतही ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही. त्यामुळे गडचिरोली, अहेरी व आरमोरी हे तीनही विधानसभा मतदार संघ राकाँकडे द्यावेत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही परिस्थिती सुधारू शकते, ऐवढी ताकद आमच्यामध्ये आहे, असा दावाही त्यांनी केला. आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे झालेत, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेले एटापल्ली पं.स.चे माजी उपसभापती घिसू मट्टामी, राकाँ नेते बापू तलांडी व ज्येष्ठ गांधीवादी उद्धवराव ताकसांडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, असा ठरावही पारित करण्यात आला, अशी माहिती धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सुरेश पोरेड्डीवार, प्रकाश ताकसांडे, प्राचार्य खुशाल वाघरे, महिला राकाँ अध्यक्ष पुष्पा अलोणे, कार्यकारी अध्यक्ष जमीर हकीम, श्रीनिवास गोडसेलवार, अरूण हरडे, जयंत येलमुले आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: It is impossible to get the Congress sitting in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.