शेती सोडून दिलेलीच बरी; मजूर मिळेना, ट्रॅक्टर परवडेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 09:01 PM2022-03-24T21:01:08+5:302022-03-24T21:03:17+5:30

Gadchiroli News डिझेलच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टर वापरणे व भाडेतत्त्वावर दुसऱ्याकडे नेणे परवडेनासे झाले. याशिवाय मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने शेती कसावे की साेडून द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर आहे.

It is better to give up farming; No labor, no tractor! | शेती सोडून दिलेलीच बरी; मजूर मिळेना, ट्रॅक्टर परवडेना !

शेती सोडून दिलेलीच बरी; मजूर मिळेना, ट्रॅक्टर परवडेना !

googlenewsNext
ठळक मुद्देडिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका मजुरीचेही दर वाढले

गडचिराेली : गेल्या दाेन वर्षांपासून काेराेनाचे संकट कायम असताना जीवनावश्यक वस्तूंसह पेट्राेल, डिझेल व गॅसच्या किमतीत वाढ झाली. ही दरवाढ कायमच आहे. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टर वापरणे व भाडेतत्त्वावर दुसऱ्याकडे नेणे परवडेनासे झाले. याशिवाय मजुरीही वाढल्याने व मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने शेती कसावे की साेडून द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर आहे.

घटते पशुधन व कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वाढता वापर आदींमुळे लागवड खर्च वाढला. याशिवाय मजुराची टंचाई, वाढलेली मजुरी, खते, कीटकनाशके व बियाणांच्या किमतीतील वृद्धी आदी कारणांमुळे शेतकऱ्यांना शेती कसणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. तरीसुद्धा स्वत:ची अंगमेहनत वापरून अनेक शेतकरी शेती कसत आहेत. परंतु आता वाढलेले ट्रॅक्टरचे भाडे व मजुरीचे दर आदी कारणांमुळे अनेक जण दुसऱ्यांना शेती कसण्यासाठी देत असल्याचे दिसून येते.

वर्षभरात ट्रॅक्टर मशागत महाग

 गडचिराेली जिल्ह्यात मागील वर्षी खरीप हंगामात चिखलणीचे दर ८०० रुपये हाेते. परंतु वर्षभरात यात २०० रुपयांची वृद्धी झाली. विविध कामांसाठी १०० ते ३०० रुपये मशागत महाग झाली.

दिवसाला ३०० रुपये, तरी मजूर मिळेना

 शेतीच्या कामासाठी २५० ते ३०० रुपये मजुरी प्रती दिवसासाठी पुरुषांना तसेच १५० ते १८० रुपये महिलांना दिली जाते. तरी सुद्धा मजूर मिळत नाही.

अल्पभूधारकांची मोठी अडचण

अल्पभूधारक शेतकऱ्यांचे शेतीचे वार्षिक आर्थिक बजेट कमी असते. त्यांना यांत्रिकीकरणाचा उपयाेग शेतात करणे महागाईमुळे परवडत नाही.

सध्या डिझेलचे दर प्रतिलिटर ९५.३८ पैसे झाले आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचे भाडेसुद्धा वाढवावे लागत आहे. दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसेल.

- जगदीश मुनघाटे, ट्रॅक्टर मालक

मागील वर्षीपासूनच इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचालकांना मशागतीचे दर वाढवावे लागले. आता पुन्हा दर वाढल्याने काय करावे, काहीच समजत नाही. - विनाेद बाबनवाडे, ट्रॅक्टर मालक

Web Title: It is better to give up farming; No labor, no tractor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती