समन्वयातून तोडगा काढणेच हिताचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2022 05:00 AM2022-05-08T05:00:00+5:302022-05-08T05:00:34+5:30
कुठलेही वाद हे विनाकारण होत नसतात तर त्यामागे काही ना काही कारण असतेच. वादावरून वाद वाढत गेल्याने फिर्यादीसह आरोपीलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागण्यासोबतच अमूल्य वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठी व निरंतर सलोख्याचे संबंध टिकवून ठेवण्यासाठी समन्वयातून तोडगा काढणेच हिताचे आहे, असे प्रतिपादन देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. भडके यांनी केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : कुठलेही वाद हे विनाकारण होत नसतात तर त्यामागे काही ना काही कारण असतेच. वादावरून वाद वाढत गेल्याने फिर्यादीसह आरोपीलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागण्यासोबतच अमूल्य वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठी व निरंतर सलोख्याचे संबंध टिकवून ठेवण्यासाठी समन्वयातून तोडगा काढणेच हिताचे आहे, असे प्रतिपादन देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. भडके यांनी केले.
देसाईगंज येथील न्यायालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवारी आयोजित लोक न्यायालयात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी पॅनल प्रमुख ॲड. मो. तारीक सौदागर, सामाजिक कार्यकर्ता पुरुषोत्तम डेंगानी, ज्येष्ठ अधिवक्ता संजय गुरु, ॲड. ज्युईली व्ही. मेश्राम, ॲड. दत्तू पिलारे, ॲड. लाँगमार्च खोब्रागडे आदी उपस्थित होते.
समाजाचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी निकोप वातावरण निर्मिती अत्यावश्यक आहे. सद्भावनेने वागल्यास असे वातावरण निर्माण करणे शक्य आहे, असे अधिवक्ता संजय गुरु यांनी सांगितले.
यावेळी न्यायालयीन सभागृहात आयोजित लोक न्यायालयात अनेक प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. यशस्वीतेसाठी लघुलेखक संजय मुन, वरिष्ठ लिपीक उमेश सुपराळे, मुकेश कावळे, अधीक्षक अनिल आमटे, विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक रवी माणुसमारे, प्रवीण मेश्राम, डि. व्ही. महाजन, आर.पी.कामटकर, व्हि. टी. नंदगीरवार, टि .के.चालुरकर, देवदत्त सहारे, राकेश बिरा व इतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.